उज्जैन ( मध्यप्रदेश ) :मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील खासदार अनिल फिरोजिया यांनी बुधवारी आपल्या कुटुंबासह दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली. पीएम मोदींनी खासदार फिरोजिया यांची 5 वर्षांची मुलगी अहाना फिरोजिया हिच्याशी संवाद साधला आणि प्रेमाने तिला चॉकलेट देऊन आशीर्वाद दिला. दोघांमध्ये 5 ते 10 मिनिटे खूप चर्चा झाली. पीएम मोदींनी अहानाला विचारले की, 'तू मला ओळखतेस का', तर अहानाने खूप प्रेमाने उत्तर दिले आणि म्हणाली, हो तुम्ही लोकसभेत पप्पांसोबत काम करता. मी तुला टीव्हीवर पाहते'. अहानाचे बोलणे ऐकून पीएम मोदी खूप हसले.
पंतप्रधानांना भेटण्याचा हट्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा मुलांना भेटत असतात. ते मुलांशी पंतप्रधानासारखे नाही तर मित्रासारखा वागतात. यामुळेच मुलांना नरेंद्र मोदी खूप आवडतात. अनिल फिरोजिया यांच्या मुलीने पंतप्रधानांशी संवाद साधला आणि तो खास क्षण सर्वांसोबत शेअर केला. तिने सांगितले की "तिचे नाव आहना फिरोजिया आहे आणि ती पाच वर्षांची आहे. पंतप्रधान मोदींना भेटून खूप आनंद झाला. मी रोज पीएम मोदींना टीव्हीवर पाहते. आज त्यांना भेटले. पप्पा नेहमी त्यांना भेटायला सांगत होते, आज पप्पांनी माझी ओळख करून दिली आणि मोदींनी सुद्धा मला चॉकलेट दिले.