उज्जैन - देशभरात कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे उद्भवलेली गंभीर आपण पाहिली. उपचार आणि ऑक्सिजनअभावी रुग्णांचे तडफडून मृत्यू झाले. दुसऱ्या लाटेतील परिस्थितीमुळे सर्वसामान्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी स्वतःच काळजी घेणं गरजेचं आहे, अशी भावना लोकांमध्ये दिसून येत आहे. याचाच प्रत्यय एका लग्नात आला आहे. लग्न म्हटलं की भेटवस्तू आल्याच. आतापर्यंत लग्नांमध्ये जीवनावश्यक वस्तू आणि महागड्या भेटवस्तू दिल्या जायच्या. यामध्ये आता ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सचाही समावेश झालाय. उज्जैनच्या सेवा धाम आश्रमातील गोयल कुटुंबातील ज्येष्ठ मुलीच्या लग्नात भेटवस्तू म्हणून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स देण्यात आले आहे. गोयल परिवाराने मुलीला 1.40 लाख रुपये किमतीचे दोन कॉन्सन्ट्रेटर्स दिले आहेत. त्यांच्या या आगळ्या-वेगळ्या भेटवस्तूचे लोकांनी कौतुक केले आहे.
1 लाख 40 हजार रुपयांचे कॉन्सन्ट्रेटर्स -