चेन्नई :Udhayanidhi Stalin On Sanatan Dharma : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचे पुत्र आणि राज्य सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी दोन दिवसांपूर्वी सनातन धर्माबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर देशभरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजपानं यावरून त्यांच्यावर जोरदार टीका केली असून, दिल्लीत त्यांच्याविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी तक्रार नोंदवण्यात आलीय.
मी नरसंहाराचं आवाहन केलं नाही : उदयनिधी स्टॅलिन यांनी रविवारी याला उत्तर दिलं. 'आपण आपल्या विधानावर ठाम असून, मी नरसंहाराचं आवाहन केलं नाही', असं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच सनातन धर्म संपुष्टात आणला पाहिजे, असं मी म्हणत राहीन, असंही उदयनिधी स्टॅलिन म्हणाले. 'सनातन धर्म हा कायमस्वरूपी आहे. तो बदलू शकत नाही. तर द्रविड विचारधारा परिवर्तनाचा संदेश देते. द्रविड संकल्पनेत सर्व समान आहेत, कोणताही भेदभाव नाही. सनातन धर्मानं लोकांना जातींमध्ये विभागलं आहे, जे मानवतेच्या हिताचे नाही. मात्र, काही लोक माझ्या शब्दांना बालिशपणानं फिरवण्याचा प्रयत्न करत आहेत की मी सनातन धर्माला मानणाऱ्या लोकांचा नरसंहार करण्याचं आवाहन केलंय', असं स्टॅलिन म्हणाले.
हेही वाचा :Udhayanidhi Stalin : मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा प्रताप; 'सनातन धर्मा'ची तुलना 'डास' आणि 'मलेरिया'शी