महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मध्य प्रदेश : फोटोशुट करताना तीन मुले नदीत बुडाले; एकाला वाचविण्यात यश - two youth drawn in Narmada river

सोशल मीडियामुळे लहान मुलासंह अनेकांना फोटो शूट करण्याची सवय लागत आहे. मात्र, कधी कधी असे फोटो शूट जीवावरही बेतू शकते. अशीच घटना मध्य प्रदेशमधील होशंगाबाद येथे घडली आहे.

Two youths drowned
Two youths drowned

By

Published : Jul 5, 2021, 7:26 PM IST

भोपाळ -नदीच्या पाण्यात फोटो काढणे मध्य प्रदेशमधील तीन मुलांच्या जीवावर बेतले आहे. नर्मदा नदीच्या हर्बल पार्क घाटावर गेलेल्या दोन मुलांचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. नाविकाच्या प्रयत्नामुळे एका मुलाचे प्राण वाचू शकले आहेत.

नर्मदा नदीच्या हर्बल पार्क घाटावर फोटो शूटच्या नादात तीन तरुण हे खोल पाण्यात उतरले. पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे तिघांचाही तोल गेला. ते पाण्यात बुडत असल्याचे नावाड्याने पाहिले. त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत दोन मुले दूरवर वाहून गेले आहेत. सुदैवाने, एका मुलाला वाचविण्यात यश आले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. होमगार्डचे जवान हे दोन्ही मुलांचा नदीत शोध घेत आहेत.

हेही वाचा-Goldprice सोन्यासह चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

फोटो शूटसाठी गेली होती मुले-

होशंगाबाद जिल्ह्यातील रसूलिया येथील रहिवाशी दक्ष खरे, राज ठाकूर, नाव्या गौर, शुभ आणि अर्ण हे सकाळी ६ वाजता फोटो काढण्यासाठी बाहेर गेले होते. पाचही जणांनी बुधनी येथील सत कुंडा येथे फोटो शूट केले. त्यानंतर १२ वाजता दक्ष खरे, राज ठाकूर आणि नाव्या गौर हे होशंगाबादच्या हर्बल पार्क घाटावर गेले. या ठिकाणी तिन्ही मुले फोटो शूट करत होते. अचानक तिघेजण पाण्यात उतरले. त्यानंतर प्रवाहात बुडाले.

हेही वाचा-महाधिवक्ता पदावरून तुषार मेहता यांना काढा; तृणमुलच्या खासदारांची राष्ट्रपतींकडे मागणी

२ मुले नदीत वाहून गेले-

नाविकाने बुडणाऱ्या मुलांना वाचविण्याचा प्रयत्न केला. दक्ष खरे याचे प्राण वाचविण्यात नाविकाला यश आले. मात्र, तोपर्यंत राज आणि नाव्या हे दूरवर वाहून गेले होते. दोन्ही मुलांना शोधण्यासाठी शोधमोहिम सुरू आहे. घटनास्थळी जवान हजर झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details