फिरोजाबाद (उत्तर प्रदेश) :उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद मधूनएक दुर्दैवी घटना समोर आली आहे. येथे दोन तरुणांचा रेल्वेची धडक लागून मृत्यू झाला. (youth died while making reels on railway track). दोन्ही तरुण रेल्वे रुळावर कानात इयरफोन घालून रील बनवत होते. (reels on railway track in Firozabad). यावेळी राजधानी ट्रेनने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
Reels on Railway Track : रुळावर रील बनवले पडले महागात; ट्रेनच्या धडकेत दोघांचा मृत्यू - railway track in Firozabad
लाइनपार पोलीस स्टेशन हद्दीतील रूपसपूर गेटजवळ ते इयरफोन घालून रील बनवत असताना येणाऱ्या राजधानी एक्सप्रेसचा आवाज त्यांना ऐकू आला नाही. त्यामुळे रेल्वेची धडक लागून दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला. (youth died while making reels on railway track).
कानात इयरफोन घालून रील बनवत होते : स्टेशन प्रभारी लाइनपार महेश सिंह यांनी सांगितले की, मैनपुरीच्या बर्नाहल पोलिस स्टेशन हद्दीतील भिकनपूर गावातील रहिवासी करण आणि त्याचा मित्र शशांक हे जवळच्या ढोलपुरा गावात मजुरी करण्यासाठी आले होते. दरम्यान, लाइनपार पोलीस स्टेशन हद्दीतील रूपसपूर गेटजवळ ते इयरफोन घालून रील बनवत असताना येणाऱ्या राजधानी एक्सप्रेसचा आवाज त्यांना ऐकू आला नाही. त्यामुळे रेल्वेची धडक लागून दोन्ही तरुणांचा वेदनादायक मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले.