महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Two Terrorists Killed सैन्यदलाच्या छावणीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा 2 जवानांना वीरमरण - Intelligence Bureau

दारहल पीएसपासून 6 किमी दूर असलेल्या ठिकाणी अतिरिक्त पथके पाठवण्यात आली आहेत. त्यांनी सांगितले की, दोन दहशतवादी देखील ठार झाले आहेत, तर दोन जवान जखमी झाले ( Two terrorists killed in Rajouris ) आहेत.

दोन दहशतवाद्यांचा खात्मा
Two terrorists killed in Rajouris Pargal

By

Published : Aug 11, 2022, 7:50 AM IST

Updated : Aug 11, 2022, 2:02 PM IST

श्रीनगर जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये आज पहाटे दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. या प्रकरणाची माहिती देताना जम्मू झोनचे एडीजीपी मुकेश सिंह म्हणाले की, राजौरीतील दारहाल भागातील परगलमधील लष्कराच्या छावणीचे कुंपण ओलांडण्याचा ( Jammu and Kashmir Two terrorists killed ) प्रयत्न कोणीतरी केला. यावेळी तेथे आगही पेटवण्यात आली. ते म्हणाले की, दारहल पीएसपासून 6 किमी दूर असलेल्या ठिकाणी अतिरिक्त पथके पाठवण्यात ( Rajouris Pargal area ) आली आहेत. त्यांनी सांगितले की, दोन दहशतवादी देखील ठार झाले ( Two terrorists killed in Rajouri) आहेत. दोन जवान जखमी झाले होते. त्यांनी वीरमरण आले आहे.

राजौरीपासून 25 किमी अंतरावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन दहशतवाद्यांनी सैन्यदलाच्या एका तुकडीवर आत्मघाती हल्ला केला. यावेळी सुरक्षा दलाने दिलेल्या प्रत्युत्तरात दोन्ही दहशतवादी ठार झाले आहेत. राजौरीपासून २५ किमी अंतरावर असलेल्या सैन्यदलाच्या तळावर दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला केला. यावेळी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालताना सुभेदार राजेंद्र प्रसाद, रायफलमॅन मनोज कुमार आणि रायफलमन लक्ष्मणन डी यांना वीरमरण आले.

घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा

दोन दहशतवाद्यांना ८ ऑगस्ट रोजी अटककाही महिन्यांपूर्वी राजधानीत 4 दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर NIA ने आणखी 2 दहशतवाद्यांना अटक केली आहे. या दोन्ही दहशतवाद्यांना रात्री उशिरा भोपाळच्या इटखेडी भागातून अटक करण्यात आली आहे. हे दोन्ही बांगलादेशी दहशतवादी खास सॉफ्टवेअरच्या मदतीने तरुणांना ऑनलाइन जिहादी साहित्य पुरवायचे. हमीदुल्ला उर्फ ​​राजू गाझी उर्फ ​​मुफाकीर उर्फ ​​समीद अली मियाँ उर्फ ​​तल्हा आणि मोहम्मद सदाकत हुसेन उर्फ ​​अबिदुल्ला अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही दहशतवाद्यांची नावे आहेत. दोन्ही आल्मी जब्लिगी इज्तिमामध्ये सहभागी होण्यासाठी भोपाळला आले होते, मात्र नंतर परतले नाहीत.

भारत-म्यानमारसीमेवर दहशतवादी हल्ला स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ईशान्येकडील भारत-म्यानमार सीमेवर दहशतवादी हल्ला झाला. अरुणाचल आणि नागालँडमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. आसाम रायफल्सची ULFA-I आणि NSCN दहशतवाद्यांशी चकमक झाली. आसाम रायफल्सने अरुणाचल प्रदेशातील चांगलांग जिल्ह्यातील पंचुपास भागात नवीन छावणी उभारली होती. NSCN-IM आणि ULFA-I च्या अतिरेक्यांनी मंगळवारी पहाटे 3 वाजता छावणीवर हल्ला केला. अरुणाचलमधील नाकानो भागात लष्कराच्या आणखी एका छावणीवरही दहशतवाद्यांनी हल्ला केला.

दहशतवादी हल्ल्यांचा कट स्वातंत्र्यदिनाच्या काही दिवस आधी इंटेलिजन्स ब्युरोने ( Intelligence Bureau ) दिल्ली पोलिसांना 10 पानांचा अलर्ट पाठवला आहे. जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटना दहशतवादी हल्ल्यांचा कट रचत असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय खलिस्तानी दहशतवादीही अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे लाल किल्ल्यावर होणाऱ्या कार्यक्रमासाठी त्यांना विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे.

हेही वाचा-भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषदेतील आरोपींची ईडी करणार चौकशी

Last Updated : Aug 11, 2022, 2:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details