महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Five Terrorists Killed In Kupwara : कुपवाड्यात 5 दहशतवादी ठार; नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न उधळला - दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Five Terrorists Killed In Kupwara : सुरक्षा दलानं आज कुपवाडामध्ये केलेल्या कारवाईत 5 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत असताना ही कारवाई करण्यात आलीय.

Two terrorists killed in Kupwara
Two terrorists killed in Kupwara

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 26, 2023, 4:04 PM IST

Updated : Oct 26, 2023, 7:08 PM IST

कुपवाडाFive Terrorists Killed In Kupwara :जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा चकमकीमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे. सुरक्षा दलांनी गुरुवारी माछिल सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडलाय. यावेळी सुरक्षा दल तसंच दहशतवाद्यात झालेल्या चकमकीत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे.

सुरक्षा दलांनी आणखी तीन दहशतवादी ठार केलेत. यापूर्वी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. अशा प्रकारे एकूण 5 दहशतवादी मारले गेले. त्यांची ओळख पटवली जात आहे. तसंच घटनास्थळी शोधमोहीम सुरू आहे. - सुरक्षा दल

घुसखोरीचा प्रयत्न उधळला : सुरक्षा दलानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात काही दहशतवादी नियंत्रण रेषेजवळ (LOC) घुसखोरीचा प्रयत्न करत होते. त्यावेळी सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना शोधून त्यांचे प्रयत्न उधळून लावले आहेत. सुरक्षा दलाच्या वतीनं श्रीनगरस्थित चिनार कॉर्प्सच्या प्रवक्त्यानं ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. चिनार कॉर्प्सच्या प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार, आज 26 ऑक्टोबरला भारतीय सुरक्षा दल, जम्मू-काश्मीर पोलीस, गुप्तचर यंत्रणांनी सुरू केलेल्या संयुक्त कारवाईत घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे.

सुरक्षा दल, दहशतवाद्यांमध्ये चकमक : निवेदनात म्हटलं आहे की, कुपवाडा भागात नियंत्रण रेषेजवळ सैनिकांनी ही कारवाई केली. सुरक्षा दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलाला या भागात दहशतवादी असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर कुपवाडामध्ये घेराबंदी करण्यात आली. नंतर भारतीय जवानांनी शोध मोहीम सुरू केली. या कारवाईदरम्यान सुरक्षा दल, दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. सुरक्षा दल संशयास्पद ठिकाणी पोहोचताच लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला.

दोन दहशतवाद्यांचा खात्मा :दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा दलांनीही गोळीबार केल्याचं सांगण्यात आलं. या कारवाईत सुरक्षा दलांनी चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार केलं आहे. चकमकीच्या ठिकाणी अजून किती दहशतवादी आहेत, हे स्पष्ट झालेलं नाही. या घटनेबाबत अधिक माहिती नंतर शेअर केली जाईल, असं लष्करानं म्हटलं आहे.

दहशतवाद्यांविरोधात शोधमोहीम सुरू :अन्य दहशतवाद्यांविरोधात शोधमोहीम सुरू असल्याचं सुरक्षा दलांनी सांगितलं. याबाबत गुप्तचर यंत्रणांना आधीच माहिती मिळाली होती की, दहशतवाद्यांचा एक गट कुपवाड्यात नियंत्रण रेषेपलीकडे घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे. या माहितीच्या आधारे देखरेख करण्यात आली. गेल्या आठवडाभरात जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या घुसखोरीची ही दुसरी घटना आहे. याआधी रविवारी सुरक्षा दलानं उरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता.

हेही वाचा -

  1. Two terrorists killed in Poonch: जम्मू-काश्मीरच्या पूँछ घुसखोरीचा प्रयत्न फसला; 2 संशयित दहशतवादी ठार
  2. Two Terrorist Killed जम्मू काश्मीरच्या नौशेरामध्ये घुसखोरीचा प्रयत्न फसला, दोन दहशतवादी ठार
  3. Two Terrorists Killed सैन्यदलाच्या छावणीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा 2 जवानांना वीरमरण
Last Updated : Oct 26, 2023, 7:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details