श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात मंगळवारी सकाळी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन स्थानिक दहशतवादी ठार झाले. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागातील राजपोरा येथे सोमवारी रात्री उशिरा सुरक्षा दलांनी दहशतवादविरोधी कारवाई सुरू केल्यानंतर चकमक सुरू झाली.
कर्मचाऱ्यासह नागरिकांच्या हत्येत सामील - अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, चकमकीत दोन स्थानिक दहशतवादी मारले गेले. त्यांनी सांगितले की, चकमकीच्या ठिकाणाहून दोन एके रायफल्स आणि गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आले आहे. काश्मीर झोनचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार म्हणाले की, मारले गेलेले दहशतवादी एका सरकारी कर्मचाऱ्यासह नागरिकांच्या हत्येत सामील होते.