पुलवामा (जम्मू आणि काश्मीर) - पुलवामाच्या मित्रीगाम भागात सुरू असलेल्या चकमकीत आणखी एक दहशतवादी मारला गेला असल्याची माहिती माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली. ( Terrorist killed Pulwama Clash ) पुलवामाच्या मित्रीगाम भागात बुधवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली, त्यावेळी ही कारवाई करण्यात भारतीय सैन्याला हे यश आले.
या चकमकीत ठार झालेले दोन्ही दहशतवादी (मार्च-एप्रिल 2022)मध्ये जिल्ह्यातील बाहेरील मजुरांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये सामील होते, अशी माहिती पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली आहे. ( Vijay Kumar, Inspector General Kashmir ) या दहशतवाद्यांची ओळख एजाज हाफिज आणि शाहिद अयुब अशी झाली असून ते अल बद्र या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत. हे दोघेही स्थानिक दहशतवादी असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.