महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पंजाबच्या फिरोजपूर बॉर्डरवर दोन दहशतवाद्यांचा खात्मा; तर दोन दहशतवाद्यांना पुलवामात कंठस्नान

पाकिस्तानच्या नापाक कारवाया सुरूच असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी रात्री पंजाबच्या फिरोजपूर बॉर्डरवर बीएसएफच्या जवानांनी दोन घुसखोरांचा खात्मा केला. तर आज सकाळी जम्मू काश्मीरमधील पुलवामाच्या नागबेरन-तरसर जंगलात

Punjab
पंजाब

By

Published : Jul 31, 2021, 12:45 PM IST

चंदीगढ - पंजाबच्या फिरोजपूर बॉर्डरवर बीएसएफच्या जवानांनी शुक्रवारी रात्री पाकिस्तानच्या दोन घुसखोरांचा खात्मा केला. तर जम्मू काश्मीरमधील पुलवामाच्या नागबेरन-तरसर जंगलात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांदरम्यान आज शनिवारी सकाळी चकमक झाली. यात दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात जवानांना यश आले. दहशतवाद्यांकडून एक AK आणि M4 जप्त केली आहे. परिसरात इतर दोन ते तीन दशतवादी लपल्याची माहिती जवानांना असून चकमक सुरू आहे. दोन्ही बाजूकडून गोळीबार होत आहे. ठार केलेल्या दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.

दुसरीकडे, शोपियानमध्ये 14 ठिकाणी सुरक्षा दलाने छापे टाकले. तर जम्मू-पुंछ महामार्गावर आयडी आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शरतपोरा येथे दहशतवादी हिदायत अहमदच्या घरावरही छापा टाकण्यात आला. त्याला गेल्या वर्षी जम्मूमधून अटक करण्यात आली होती.

नागबेरन-तरसरच्या जंगलात काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर शोध सुरू करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या दरम्यान सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू झाला. प्रत्युत्तरादाखल दोन दहशतवादी ठार झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा 5 दहशतवाद्यांचा गट होता. एक स्थानिक आणि इतर चार पाकिस्तानी दहशतवादी होते. ते लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी होते. यापूर्वी 22 जुलै रोजी सोपोरच्या वारपोरा येथे लष्कर कमांडर फयाज अहमद आणि शाहीन मौलवी यांना सुरक्षा दलांनी ठार केले होते.

बारामुल्ला येथे ग्रेनेड हल्ल्यात 3 जवान जखमी -

दुसरीकडे, दहशतवाद्यांनी शुक्रवारी बारामुल्लामध्ये सुरक्षा दलांवर ग्रेनेडने हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान आणि एक नागरिक जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर सुरक्षा दलांनी परिसराला घेराव घालून शोध मोहीम सुरू केली.

ABOUT THE AUTHOR

...view details