नवी दिल्ली - भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये सीमा भागात होणारी एखादी चकमक ही काही नवी बाब नाही. पण, सध्या भारत आणि पाकिस्तान ही दोन्ही राष्ट्र एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहेत. पाकिस्तानच्या दोन नागरिकांना भारताने सुखरुप पाकिस्तानच्या जवानांच्या ताब्यात दिलं. यातील एक जण चुकून सीमा पार करून भारतात आला होता. तर दुसरी व्यक्ती व्हिसा संपल्यानंतरही भारतात फिरत होती.
भारतीय तुरुंगात असलेल्या दोन पाकिस्तानी नागरिकांना शनिवारी अटारी सीमेद्वारे पाकिस्तानला सोपवण्यात आले. दोघांपैकी एक अल्पवयीन आहे. अब्बास अली खान (42) आणि भाग चंद (17) अशी त्या दोघांची नावे आहेत. ही माहिती अटारी बॉर्डरचे प्रोटोकॉल अधिकारी अरुणपाल सिंह यांनी दिली.