श्रीनगर: मध्य काश्मीरच्या श्रीनगर जिल्ह्यातील रैनावरी भागात सुरक्षा दलांशी (Terrorists and security forces) झालेल्या चकमकीत ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांची (Two Militants Killed) नावे रईस अहमद भट आणि हिलाल अहमद राह अशी आहेत, पोलिसांनी सांगितले की, त्यांना मिळालेल्या गुप्त माहिती नंतर त्यांनी रैनावरी भागात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली होती. ठार झालेल्या अतिरेक्यांपैकी एकाकडे माध्यमाचे ओळखपत्र होते. रईस अहमद भट हा पूर्वी पत्रकार होता आणि अनंतनागमध्ये 'व्हॅली न्यूज सर्व्हिस' हे ऑनलाइन न्यूज पोर्टल चालवत होता. भट 2021 मध्ये दहशतवादी श्रेणीत होता. त्याच्यावर या पुर्वीच दहशतवादी कृत्याबद्दल दोन गुन्हे दाखल आहेत.
Two Militants Killed : श्रीनगर चकमकीत दोन अतिरेकी ठार - दहशतवादी आणि सुरक्षा दल
जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये (Srinagar, the capital of Jammu and Kashmir) बुधवारी रात्री दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये (Terrorists and security forces) झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार (Two Militants Killed) झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की, त्यांना श्रीनगरमधील रैनावरी येथे अतिरेकी लपल्याची असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी त्या भागात घेराबंदी करत शोध मोहीम सुरू केली होती.
चकमकीत दोन अतिरेकी ठार
चकमकीत मारला गेलेला दुसरा अतिरेकी बिजबेहाराचा हिलाल अह राह म्हणून ओळखला जातो, जो 'सी' वर्गीकृत दहशतवादी आहे, असे काश्मीर झोन पोलिसांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी माहिती दिली की, चकमकीत मारले गेलेले दोन अतिरेकी नागरिकांच्या हत्येसह अलीकडील अनेक दहशतवादी गुन्ह्यांमध्ये सामील होते. मारल्या गेलेल्या एका अतिरेक्याकडे माध्यमाचे कार्ड सापडले. अतिरेकी माध्यमाच्या ओळखीचा गैरवापर करत असल्याचे यातुन समोर आले.