जम्मू काश्मीर - दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील नौपोरा भागात बुधवारी सुरक्षा दलांनी केलेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. ( Two Militants Killed In Kulgam Encounter ) काश्मीर झोन पोलिसांनी ट्विट करून ही माहिती दिली. सध्या परिसरात सुरक्षा दलांचे ऑपरेशन सुरू आहे.
पोलीस प्रवक्त्याने सांगितले की, नौपोरा भागातील मीर बाजार भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली. यादरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर अंदाधुंद गोळीबार करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षा दलांनी त्यांना पळून जाण्याची संधी दिली नाही आणि चकमक सुरू झाली.