श्रीनगर - सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत दोन दहशवादी ठार झाले आहेत. सुरक्षा दलाने ही कारवाई कुलगाममधील चिम्मरमध्ये केली आहे. अद्याप, दोन्ही दहशतवाद्यांची ओळख पटू शकली नाही.
मंगळवारी रात्री, सुरक्षा दलाने केलेल्या संयुक्त मोहिमेत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. ही कारवाई श्रीनगर जिल्ह्यातील परिमपोरा परिसरात करण्यात आल्याचे सुरक्षा दलाच्या नॉर्थन कमांडने दिली आहे.
सुरक्षा दलाला दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलाच्या जवानांनी शोध मोहिम सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांबरोबर सुरक्षा दलाची चकमक झाली. काश्मीर झोन पोलिसांनी ट्विट करत सुरक्षा दलाच्या कारवाईची माहिती दिली आहे. कुलगाम एन्काउंटर अपडेट -२ दोन दहशतवादी ठार झाले आहेत. कारवाई अजून सुरू आहे. माहिती दिली जाईल, असे काश्मीर पोलिसांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा-ह्रदयद्रावक : कर्जबाजारीपणाला कंटाळून एकाच कुटुंबातील ६ व्यक्तींची आत्महत्या
रविवारी जम्मूत हवाई दलाच्या तळावर करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर पुन्हा जम्मूच्या कालूचक आणि कुंजवानी भागात सैनिकी तळाजवळ दोन ड्रोन घोंघावताना दिसले. भारतीय सैन्याकडून फायरिंग करण्यात आल्यानंतर हे ड्रोन दिसेनासे झाले. सध्या भारतीय सैन्याकडून बेपत्ता ड्रोनची माहिती घेण्यासाठी शोध मोहीम राबवली जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून दहशतवाद्यांकडून हेरगिरी आणि हल्ल्यांसाठी ड्रोनचा वापर केला जात आहेत. कारण, थेट हल्ल्यापेक्षा ड्रोन हल्ले करण्यात हल्लेखोरांना कमी जोखीम उचलावी लागते.
हेही वाचा-MAHARASHTRA BREAKING : रात्र गेली हिशोबात !पोरगं नाही नशिबात; गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर टीका
दोन दहशतवाद्यांचा खात्मा -
श्रीनगरच्या मल्हूरा परीमपोरा भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या दोघांपैकी एक दहशतवादी हा पाकिस्तानच्या लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा कमांडर होता. अबरार असं या कंठस्नान घातलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. तर दुसरा पाकिस्तानी नागरिक होता.