श्रीनगर (जम्मू ) - अनंतनाग चकमकीत दोन दहशतवादी ठार ( Two militants killed in Encounter ) झाले आहेत. या कारवाईत मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला ( gunfight in the Bijbehera area ) आहे.
सुरक्षा दलाने कारवाईत काही आक्षेपार्ह साहित्य जप्त केले आहे. सुरक्षा दलाचे सर्च ऑपरेशन ( search operation by security forces ) सुरू असल्याची माहिती काश्मीर झोन पोलिसांनी ( Kashmir Zone Police ) दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर पोलिसांनी शनिवारी दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहारा भागात चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार केले. आयजीपी काश्मीर विजय कुमार यांनी सांगितले की, विश्वसनीय माहितीच्या आधारे पोलीस, लष्कराच्या 3 आरआर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने जिल्ह्यातील शट्टीपोरा गावात शोध मोहीम सुरू केली. आयजीपी काश्मीरच्या म्हणण्यानुसार, लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. त्यामुळे चकमक घडून आली.