अनंतनाग ( श्रीनगर ) - दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील डुरू किरी भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार ( Two militants killed in Dooru Kiri ) झाले. सुरक्षा दलांना या भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती.
पोलीस, 19 आरआर सैन्यदल आणि सीआरपीएफ यांनी संयुक्तपणे कारवाई ( security forces joint operation in Kashmir ) सुरू केली. सुरक्षा दलांनी शोधमोहीम राबवताच परिसरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर अंदाधुंद गोळीबार केला. त्यानंतर परिसरात सुरू असलेल्या शोध मोहिमेचे चकमकीत रूपांतर ( encounter in Anantnag ) झाले.
सुरक्षा दलाच्या कारवाईत दोन अज्ञात अतिरेकी ठार झाल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात दोन ते तीन दहशतवादी लपून बसले असावेत. अनेक दिवसांपासून गोळ्यांची चकमक सुरू आहे. काश्मीर पोलीस झोनने अधिकृत ( Kashmir Police Zone on encounter ) ट्विटरवर चकमकीबाबत तपशील दिला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोरू किरी भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली आहे.