महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Two Men Get Married : दारूच्या नशेत दोन दारुड्यांनी केले एकमेकांशी लग्न.. अन् झालं असं काही.. - दोन पुरुषांनी लग्न केले मेडक

दारूच्या नशेत असताना कोण काय करेल याचा भरवसा नाही. असाच काहीसा प्रकार तेलंगणातील मेडक जिल्ह्यात झाला. दारूच्या नशेत असलेल्या दोन दारुड्यांनी एकमेकांशी लग्न केले. मात्र, दुसऱ्या दिवशी नशा उतरल्यास प्रकरण थेट पोलिसांत गेले अन् आर्थिक तडजोड करून प्रकरण मिटविण्यात आले.

दारूच्या नशेत दोन दारुड्यांनी केले एकमेकांशी लग्न.. अन् झालं असं काही..
दारूच्या नशेत दोन दारुड्यांनी केले एकमेकांशी लग्न.. अन् झालं असं काही..

By

Published : Apr 6, 2022, 8:39 PM IST

मेडक ( तेलंगणा ) - मेडक जिल्ह्यातील चिलपचेड येथे दोन पुरुषांनी लग्न केले. सोमवारी रात्री दारूच्या नशेत असलेल्या पुरुषांचे लग्न झाले. एका तरुणाने दुसऱ्या तरुणाशी लग्नगाठ बांधली. त्यावेळी दोघे मद्यधुंद अवस्थेत होते.

पाम वाईन ( नीरा ) दुकानात व्हायची भेट : संगारेड्डीच्या जोगीपेठ येथील एक तरुण ( वय 21 ) आणि चिलपचेड झोनमधील चांदूर येथे दुसरा तरुण ऑटोचालक ( वय 22 ) हे दोघे कोलचाराम झोनमधील दुमपालकुंटा येथील पाम वाइन (नीरा) दुकानात भेटले. काही काळानंतर त्यांची चांगली मैत्री झाली. ते रोज पाम वाईन शॉपवर भेटायचे आणि एकत्र दारू प्यायचे.

एक लाख रुपयांची मागणी : 1 एप्रिल रोजी जोगीपेठ येथील तरुणाने मद्यधुंद अवस्थेत चांदूरच्या तरुणाशी लग्न केले. दुसऱ्या दिवशी तो चांदूरमधील तरुणाच्या घरी गेला. जोगीपेठ येथील तरुणाने चांदूर येथील तरुणाच्या आईवडिलांना सगळा किस्सा सांगितला. मी तुमच्या मुलाशी लग्न केले असून, मी त्याच्यासोबत राहण्यासाठी आलो असल्याचे तो म्हणाला. त्याचे बोलणे ऐकून चांदूर येथील तरुणाच्या आई-वडिलांना धक्का बसला आणि त्यांनी त्याला निघून जाण्यास सांगितले. पण जोगीपेठ येथील तरुणाने त्यांचे ऐकले नाही. एक लाख रुपये दिले तरच जाईन, असे तो त्यांना म्हणाला. ते पैसे देण्यास तयार नसल्याने जोगीपेठ येथील तरुणाने पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली.

दहा हजारांवर झाली तडजोड : याप्रकरणी चिलपछेड पोलीस व जोगीपेठ व चांदूर गावातील ज्येष्ठ नागरिकांना मध्यस्ती करावी लागली. त्यांनी दोन्ही कुटुंबांना बोलावून या विषयावर चर्चा केली. शेवटी चांदूर येथील तरुणाच्या कुटुंबीयांनी जोगीपेठ येथील तरुणाला 10 हजार रुपये दिल्यानंतर त्याने तक्रार मागे घेतली.

ABOUT THE AUTHOR

...view details