लखनौ (उत्तर प्रदेश) - हैदराबादपाठोपाठ उत्तर प्रदेशमधील सिंहांंमध्येही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. इटावा सफारी पार्कमधील दोन सिंहिणींना कोरोनाची लागण झाली आहे. ही माहिती इटावा सफारीच्या संचालकांनी दिली आहे.
इटावा लायन सफारीच्या प्रशासकीय यंत्रणेने कोरोनाचा संसर्ग झालेल्या सिंहिणींची प्रकृती स्थिर असल्याचे म्हटले आहे. ८ वर्षांची जेनिफर आणि ४ वर्षांची गौरी अशी कोरोनाचा संसर्ग झालेल्या सिंहिणींची नावे आहेत. दोन्ही सिंहिणींचे तापमान ३० एप्रिलला १०० डिग्री सेल्सियसहून अधिक आढळले होते. इंडियन व्हेटिरिनरी रिसर्च इन्स्टिट्यूटने दोन्ही सिंहिणींना संसर्ग असल्याचा अहवाल ३ व ५ मे रोजी दिला आहे.
हेही वाचा-'लोकांचे प्राण जाऊ शकतात, पण पंतप्रधानांची जीएसटी वसूली थांबत नाही'