महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दहशतवाद्यांचे पुन्हा भ्याड कृत्य; कुलगाममध्ये दोन परप्रांतीय मजुरांची हत्या - मजुरांची दहशतवाद्यांनी केली हत्या

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा भ्याड कृत्य केले आहे. कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी दोन परप्रांतीय मजुरांची गोळ्या घालून हत्या केली असून, तर तिसरा मजूर जखमी झाला आहे.

terrorists open fire
मजुरांची दहशतवाद्यांनी केली हत्या

By

Published : Oct 18, 2021, 12:52 AM IST

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा भ्याड कृत्य केले आहे. कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी दोन परप्रांतीय मजुरांची गोळ्या घालून हत्या केली असून, तर तिसरा मजूर जखमी झाला आहे. काश्मीर झोन पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवर याबाबतची माहिती दिली. पोलीस आणि सुरक्षा दलांनी या परिसराला वेढा घातला असून, सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.

  • हत्या केलेले दोघेही बिहारचे रहिवासी -

मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला दहशतवादी मजुरांच्या भाड्याच्या घरात शिरले आणि त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात मृत्यू झालेले दोन्ही मजूर बिहारचे रहिवासी आहेत. राजा ऋषिदेव आणि जोगिंदर ऋषिदेव असे मृत्यू झालेल्या मजुरांची नावे असून, चुनचून ऋषिदेव असे जखमी मजूराचे नाव आहे.

  • परप्रांतीय मजुरांवर दहशतवाद्यांचा तिसरा हल्ला -

जम्मू-काश्मीरमध्ये 24 तासात परप्रांतीय मजुरांवर झालेला हा तिसरा हल्ला आहे. याआधी शनिवारी दहशतवाद्यांनी श्रीनगर आणि पुलवामा जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन परप्रांतीय मजुरांची गोळ्या घालून हत्या केली होती. श्रीनगरमधील घटनेत दहशतवाद्यांनी बिहारचे रहिवासी अरविंद कुमार आणि पुलवामा येथील घटनेत यूपीचे रहिवासी सगीर अहमद यांची गोळ्या घालून हत्या केली होती. मागील काही दिवसांमध्ये दहशतवाद्यांकडून जम्मू-काश्मीर घाटीत परप्रांतीय मजुरांच्या हत्येच्या घटनेत वाढ झाली आहे.

हेही वाचा -Shopian Encounter : लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्तान; मोठ्या प्रमाणात हत्यारे जप्त

  • दोन दिवसांपूर्वी पुंछ जिल्ह्यात दोन सैनिक हुतात्मा -

पुंछ जिल्ह्यातील दहशतवादविरोधी कारवाईत गुरुवारी(15 ऑक्टोबर) एक कनिष्ठ कमिशन्ड अधिकारी (जेसीओ) आणि एक सैनिक शहीद झाले होते. पुंछ जिल्ह्यात दहशतादविरोधात लढा देताना गेल्या पाच दिवसांत सात जवान हुतात्मा झाले आहेत. काश्मीरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांच्या हालचाली सुरू आहेत. त्यानंतर सुरक्षा दल अलर्ट झाले आहे. सुरक्षा दलाने अनेक ठिकाणी दहशतवाद्यांना पकडण्यासाठी जोरदार शोधमोहीम सुरू केली आहे. तर दहशतवाद्यांकडून सामान्यांना लक्ष केले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details