राजौरी Rajouri Encounter :जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात बुधवारी (२२ नोव्हेंबर) सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन कॅप्टनसह चार जवान हुतात्मा झाले. ही चकमक स्थानिक धर्मसालच्या बाजीमल भागात झाली. या भागात दहशतवाद्यांच्या एका गटाच्या हालचालीची माहिती मिळाल्यानंतर विशेष दलांसह सैन्य तैनात करण्यात आलं होतं.
दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती : राजौरी जिल्ह्यातील धरमसालच्या बाजीमल भागात दोन दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सैन्य आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी परिसराला वेढा घातला. या दरम्यान दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू झाला. त्याला सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिलं. दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या या चकमकीत दोन अधिकाऱ्यांसह (कॅप्टन) चार जवान हुतात्मा झाले आहेत.
अनेक जवान जखमी : राजौरीतील बाजी माल जंगलात झालेल्या चकमकीत सुरुवातीच्या गोळीबारात सैन्याच्या एका कॅप्टनचा मृत्यू झाला. तर इतर तीन पॅरा कमांडो गंभीर जखमी झालेत. त्यानंतर दोन सैनिकांना सैन्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अन्य जखमी सैनिकाची प्रकृती स्थिर आहे. या परिसरात संशयास्पद हालचाली सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. या गोळीबारात अनेक जवान जखमीही झाले आहेत.