पिथौरागढ: सीमावर्ती जिल्ह्यातील पिथौरागढच्या धारचुला मल्ली बाजारमध्ये हृदय हेलावणारे चित्र समोर आले आहे. मुसळधार पावसानंतर ( Pithoragarh heavy rain ) डोंगरावरून ढिगारा आणि दगड पडल्याने धारचुलामध्ये दोन घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली ( Two houses collapsed in Dharchula ) आहेत. शुक्रवारी सायंकाळी उशिरा झालेल्या मुसळधार पावसानंतर डोंगरावरून ढिगाऱ्यासह मोठमोठे दगड खाली कोसळले. दरड कोसळत असल्याचे पाहून घरातील सदस्य कसेबसे बाहेर पडले आणि त्यांनी आपला जीव वाचविला. निसर्गाच्या कहराचा हा व्हिडिओ समोर आला आहे. तो व्हिडिओ पाहून तुमच्या अंगाचा थरकाप उडेल.
सुदैवाने लोक वेळेत घराबाहेर पडले, अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती. मात्र, काही वेळातच मलबा आल्याने दोन्ही घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली. दोन्ही कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय इतर अनेक घरांचेही किरकोळ नुकसान झाले आहे. ढिगारा आल्यानंतर आणखी 14 घरांनाही धोका निर्माण झाला असून, पोलीस प्रशासन घरे रिकामी करत आहेत.