तुमकूर ( बंगळुरू ) - कर्नाटकामधील तुमकूरमध्ये एक घटना समोर आली आहे. एकमेकांवर प्रेम करणाऱ्या दोन तरुणींनी पोलिसांकडे लग्नाची परवानगी ( two girls love in Tumkur ) मागितली होती. मात्र, पोलिसांनी त्यांचे लग्न होऊ दिले नाही. पालकांना ही बाब कळताच अल्पवयीन मुलींची समजूत घालून ( two girls seek permission for marriage ) त्यांना घरी नेले.
तुमकूर शहरातील डिप्लोमा कॉलेजमध्ये ( Diploma College in Tumkur ) शिकणाऱ्या या दोन 22 वर्षीय तरुणी वर्गमित्र आहेत. कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांचे एकमेकांवर प्रेम जडले. एक तरुणी तुमकूरची तर दुसरी महिला पावगडा तालुक्यातील ( two girls love in Pavgada taluka ) आहे. दोघेही एकाच समाजातील असून त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी ही बाब त्यांच्या पालकांना सांगितली आहे.
दोन्ही तरुणी घरी परतल्या-तरुणीच्या आई-वडिलांना हे मान्य झाले नाही. त्यामुळे तरुणींनी शहरातील टिळक पार्क पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी लग्न करण्याची परवानगी देण्यास नकार दिल्यानंतर दोघांनी शहरातून पळ काढल्याची चर्चा होती. मात्र, गुरुवारी दोघेही शहरात परतले. लग्नाच्या तयारीत असलेले पालक व पोलीस घटनास्थळी आले. त्यांची समजूत घालून त्यांनी अल्पवयीन मुलींना घरी नेले.