सिलीगुडी (प. बंगाल) : सोमवारी पहाटे भारत नेपाळ सीमेवर दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. (Two foreign nationals arrested). अटक करण्यात आलेल्या नागरिकांमध्ये एक न्यूझीलंडचा तर दुसरा बांगलादेशचा नागरिक आहे. दोघांकडूनही अनेक बनावट भारतीय ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या घटनेने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दोघांनी भारतात येण्यापूर्वी बनावट भारतीय ओळखपत्रे कशी तयार केली, याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. (foreign nationals arrested on India Nepal border).
India Nepal Border : भारत नेपाळ सीमेवर दोन परदेशी नागरिकांना अटक, दोघांकडून बनावट भारतीय ओळखपत्रे जप्त - भारत नेपाळ सीमेवर
अटकेनंतर दोघांनाही खारीबारी पोलिस स्टेशनच्या स्वाधीन करण्यात आले. कोण्या तिसर्या व्यक्तीने किंवा संस्थेने दोघांना बनावट ओळखपत्र बनवून भारतात प्रवेश करण्यास मदत केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. (Two foreign nationals arrested).
प्रथम न्यूझीलंडच्या नागरिकाला अटक : सशस्त्र सीमा दलाच्या जवानांनी सर्वप्रथम न्यूझीलंडच्या नागरिक अँड्र्यू जेम्सला सिलीगुडीला लागून असलेल्या खरीबारी ब्लॉकमधील भारत-नेपाळ सीमेवरील पानीटंकी येथून अटक केली. त्यानंतर, पोलिसांनी संशयिताकडून अनेक बनावट भारतीय आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स जप्त केले. पोलीस सूत्रांनुसार, SSB च्या 8 व्या बटालियनच्या जवानांनी त्याला अटक केली. जेम्स बनावट भारतीय आधार कार्ड बनवून भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता.
तिसर्या व्यक्तीने केली मदत : आरोपीची चौकशी केल्यानंतर बांगलादेशी नागरिक मोहम्मद नुरुल इस्लामला सीमाभागातून अटक करण्यात आली. अटकेनंतर दोघांनाही खारीबारी पोलिस स्टेशनच्या स्वाधीन करण्यात आले. कोण्या तिसर्या व्यक्तीने किंवा संस्थेने दोघांना बनावट ओळखपत्र बनवून भारतात प्रवेश करण्यास मदत केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. अटक केलेल्यांना सोमवारी सिलीगुडी उपविभागीय न्यायालयात पाठवण्यात आले. या दोघांतील संबंधांचा पोलीस तपास करत आहेत.