महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांचा सीआरपीएफच्या तुकडीवर हल्ला; एक जवान हुतात्मा - militant attack in Lawaypora, Srinagar

लवायपोरा भागामध्ये पाहणी करत असणाऱ्या एका सीआरपीएफच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला. आज (गुरुवार) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये जखमी झालेल्या जवानांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले..

Two CRPF troopers killed in militant attack in Lawaypora, Srinagar
श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांचा सीआरपीएफच्या तुकडीवर हल्ला; दोन जवान हुतात्मा

By

Published : Mar 25, 2021, 4:58 PM IST

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या लवायपोरा भागामध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या एका तुकडीवर हल्ला केला. यामध्ये एक जवान हुतात्मा झाला असून, तीन जवान गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

या भागामध्ये पाहणी करत असणाऱ्या एका सीआरपीएफच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला. आज (गुरुवार) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये जखमी झालेल्या जवानांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यांपैकी एकाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला, तर तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात..

ABOUT THE AUTHOR

...view details