महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Omicron In India : भारतात ओमायक्रॉनचा शिरकाव, कर्नाटकमध्ये सापडले दोन रुग्ण

भारतात ओमायक्रॉन (Omicron Variant) या कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटचा शिरकाव झाला आहे. कर्नाटकमध्ये ओमायक्रॉन व्हेरीयंटचे दोन रुग्ण आढळले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे जॉईंट सेक्रेटरी लव अग्रवाल यांनी दिली आहे.

Omicron Variant
Omicron Variant

By

Published : Dec 2, 2021, 4:43 PM IST

Updated : Dec 2, 2021, 5:09 PM IST

नवी दिल्ली - भारतात ओमायक्रॉन ( Omicron Variant) या कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटचा शिरकाव झाला आहे. कर्नाटकमध्ये ओमायक्रॉन व्हेरीयंटचे दोन रुग्ण (Two cases of Omicron Variant in karnatak) आढळले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे जॉईंट सेक्रेटरी लव अग्रवाल यांनी दिली आहे.

'रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे' -

ओमायक्रॉन व्हेरीयंट सापडलेल्या सर्व रुग्णांमध्ये आतापर्यंत सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. दरम्यान, देशातील आणि जगभरातील अशा सर्व रुग्णांमध्ये आतापर्यंत कोणतीही गंभीर लक्षणे आढळून आलेली नाहीत, असेही लव अग्रवाल म्हणाले.

'घाबरण्याचे कोणतेही कारण नाही' -

आरोग्य मंत्रालयाने स्थापन केलेल्या 37 प्रयोगशाळांच्या जीनोम सिक्वेसिंगनुसार कर्नाटकमध्ये आतापर्यंत ओमायक्रॉनचे (Omircron) चे दोन रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, घाबरण्याचे कोणतेही कारण नसून सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. सर्वांनी कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे आयसीएमआरचे डीजी बलराम भार्गव यांनी म्हटले आहे.

कर्नाटकातून महाराष्ट्रात वाहतूक -

कर्नाटक सरकारकडून कर्नाटकात येणाऱ्या प्रत्येक वाहनधारकांची काटेकोरपणे तपासणी केली जात आहे. कोरोना चाचणी किंवा दोन डोस घेतलेले प्रमाणपत्र नसेल त्यांना कर्नाटकामधून महाराष्ट्रात परत पाठवले जात आहे. त्यामुळे आता कर्नाटकात ओमाक्रॉनचे दोन रुग्ण आढळल्याने महाराष्ट्रातही अशी कडक अंमलबजावणी सुरू करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

व्हॅरिएन्टविषयी संशोधन सुरू

कोरोनाचा 'B.1.1.529' हा नवीन प्रकार म्हणजेच व्हॅरिएन्ट दक्षिण आफ्रिकेत आढळून आल्याचे सर्वप्रथम 24 नोव्हेंबर 2021 रोजी निष्पन्न झाले. ज्या नमुन्यांमध्ये हा व्हॅरिएन्ट निष्पन्न झाला ते नमुने 9 नोव्हेंबर 2021 रोजी गोळा करण्यात आले होते. या विषाणूत मोठ्या प्रमाणात म्युटेशन्स म्हणजेत बदल झाल्याचे दिसून आले आहेत. यातील काही बदल हे चिंताजनक आहेत. इतर चिंताजनक व्हॅरिएन्टच्या तुलनेत या व्हॅरिएन्टच्या माध्यमातून रिइन्फेक्शनचा धोका वाढल्याचे प्राथमिक पुराव्यांतून दिसत आहे. सध्या या व्हॅरिएन्टविषयी वेगवेगळे संशोधन केले जात असून या माध्यमातून त्याच्याविषयीची अधिक माहिती गोळा केली जात आहे.

हेही वाचा-Omicron Variant : महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांसाठी RTPCR चाचणी आवश्यक; कर्नाटक सरकारचा निर्णय

Last Updated : Dec 2, 2021, 5:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details