महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सुरतच्या दोन ब्रेन डेड मित्रांनी असे दिले 12 रुग्णांना नवीन जीवन - ब्रेन डेड मित्र

28 ऑगस्ट रोजी डॉक्टरांनी दोन्ही मित्रांना ब्रेन डेड घोषित केले. त्यामुळे दोघांच्या कुटुंबियांनी डोनेट लाइफ संस्थेच्या माध्यमातून आपल्या मुलांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयामुळे दोन्ही मित्रांचे मूत्रपिंड, यकृत, हृदय, फुफ्फुसे आणि डोळे दान करण्यात आले. ज्यामुळे 12 लोकांना जीवन मिळणार आहे.

ब्रेन डेड मित्र
ब्रेन डेड मित्र

By

Published : Aug 31, 2021, 7:12 PM IST

Updated : Sep 1, 2021, 5:17 PM IST

सुरत - डोनेट लाइफद्वारे 35 वे हृदय दान आणि 9 वे फुफ्फुस दान आहे. सुरतच्या डोनेट लाइफ संस्थेतर्फे एकाच दिवसात 13 अवयव आणि उतीदान करण्यात आले. ब्रेनडेड कल्पेश कुमार पंड्या आणि ब्रेनडेड क्रिश संजय कुमार, गांधी कुटुंबातील दोन 18 वर्षीय मित्र एका अपघातामुळे ब्रेन डेड झाले होते. दोन्ही कुटुंबांनी डोनेट लाइफ या चॅरिटीद्वारे आपल्या मुलांची किडनी, यकृत, हृदय, फुफ्फुसे आणि डोळे दान करण्याचा विचार केला. त्यानंतर 12 लोकांना नवीन जीवन मिळणार आहे.

दोन ब्रेन डेड मित्रांनी 12 रुग्णांना दिले नवीन जीवन

मित ओक क्रिश दोघेही मित्र होते. ते वर्ग पहिलीपासून एकत्र अभ्यास करत होते. 24 ऑगस्ट रोजी दोघेही दुपारी 3 वाजता एक्टिव्हावर जात असताना दोघेही अपघातात गंभीर जखमी झाले होते. जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे दोघांना ब्रेन हेमरेज झाल्याचे निष्पन्न झाले. क्रिसला ब्रेन हॅमरेज तसेच त्याच्या मेंदूत रक्ताच्या गाठी निर्माण झाल्या होत्या. याला न्यूरोसर्जनने काढले. 28 ऑगस्ट रोजी डॉक्टरांनी दोन्ही मित्रांना ब्रेन डेड घोषित केले. त्यामुळे दोघांच्या कुटुंबियांनी डोनेट लाइफ संस्थेच्या माध्यमातून आपल्या मुलांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयामुळे दोन्ही मित्रांचे मूत्रपिंड, यकृत, हृदय, फुफ्फुसे आणि डोळे दान करण्यात आले. ज्यामुळे 12 लोकांना जीवन मिळणार आहे.

प्रत्योरोपणासाठी अवयव घेऊन जातांना

क्रिशचे फुफ्फुस गेल्या दीड वर्षांपासून सतत 24 तास ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या सेवानिवृत्त सीआरपीएफ जवानाला देण्यात आले आहे. सुरत ते हैदराबादपर्यंत फुफ्फुसाला पोहोचण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर बनवून 926 किमी अंतर 180 मिनिटांत पुर्ण करण्यात आले. मितचे हृदय, यकृत आणि चार मूत्रपिंड अहमदाबादला पाठवण्यात आले. सुरत ते अहमदाबाद हे 288 किमी अंतर 90 मिनिटात पुर्ण केले. वडोदरा येथील एका 21 वर्षीय मुलीमध्ये मितचे हृदय प्रत्यारोपण करण्यात आले. तर क्रिशचे यकृत राजकोटमधील 55 वर्षीय शिक्षकाकडे प्रत्यारोपित करण्यात आले, तर मितचे यकृत बयाड येथील 47 वर्षीय शिक्षकाकडे प्रत्यारोपण करण्यात आले. दान केलेल्या चार मूत्रपिंड किडनी रोग आणि संशोधन केंद्र (IKDRC) ला दान करण्यात आले आहेत. अहमदाबाद आणि हैदराबाद या ठिकाणी हे अवयव येण्यासाठी एकूण 4 ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात होते.

प्रत्योरोपणासाठी अवयव घेऊन जातांना

हेही वाचा -hawker attack : बरे होऊन आपले काम सुरूच ठेवणार, कल्पिता पिंपळेंनी व्यक्त केला निर्धार

Last Updated : Sep 1, 2021, 5:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details