संगरूर - जिल्ह्यात 2016 च्या पोलीस भरती संदर्भात गेल्या तीन महिन्यांपासून मुख्यमंत्री भगवंत मान ( Chief Minister Bhagwant Mann ) यांच्या निवासस्थानासमोर मुला-मुलींचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, आंदोलनात बसलेल्या दोन मुलांनी काल रात्री आत्महत्येचा प्रयत्न ( Two boys tried suicide ) केला. काल रात्री एका तरुणाने विषारी औषध प्यायले आणि एका मुलाने गळफास घेण्याचा प्रयत्न केला, त्याला घटनास्थळी उपस्थित आंदोलकांनी वाचवले.
Two Boys Tried TO Suicide : मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर दोघांचा आत्महत्येचा प्रयत्न - Sangrur District in Punjab
संगरूर - पंजाबमधील संगरूर जिल्ह्यात ( Sangrur District in Punjab ) आंदोलन करीत असलेल्या दोन मुलांनी काल आत्महत्येचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री भगवंत मान ( Chief Minister Bhagwant Mann ) यांच्या निवासस्थानासमोर घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. आंदोलकांचे वेळीच त्यांच्याकडे लक्ष गेल्याने त्यांचे प्राण वाचू शकले.
Two boys tried suicide
आंदोलकांचा इशारा - मुख्यमंत्री भगवंत मान ( Chief Minister Bhagwant Mann ) यांच्या निवासस्थानासमोर घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. काल आंदोलकांकडून या ठिकाणी आणखी उग्र आंदोलन होऊ शकेल, अथवा विपरित घटना घडू शकेल, असा इशारा देण्यात आला होता. मात्र, प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आत्महत्येच्या प्रयत्नाची ही घटना घडली आहे.