महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Two Blast In J-K : जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये आठ तासांत दोन बलास्ट, दोन जखमी - डीआयजी रियासी रेंज सुलेमान चौधरी

बुधवारी रात्री उधमपूर ( Udhampur Blasts ) येथील पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या रिकाम्या बसमध्ये झालेल्या स्फोटात ( Two Blasts In Udhampur ) दोन जण जखमी ( 2 injured in explosion in parked bus in Udhampur ) झाले. उधमपूरचे डीआयजी रियासी रेंज सुलेमान चौधरी यांनी सांगितले की, रात्री 10.30 च्या सुमारास हा स्फोट झाला.

Two Blasts In Udhampur
Two Blasts In Udhampur

By

Published : Sep 29, 2022, 8:00 AM IST

उधमपूर (जम्मू-काश्मीर):जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये ( Udhampur Blasts ) आठ तासांत दोन स्फोट ( Two Blasts In Udhampur ) झाल्याची माहिती समोर आली आहे. पहिला स्फोट बुधवारी रात्री उधमपूरमधील पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या रिकाम्या बसमध्ये झाला. या स्फोटात दोन जण जखमी ( 2 injured in explosion in parked bus in Udhampur ) झाले आहेत. तर दुसऱ्या स्फोटाबाबत अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. पहिली घटना उधमपूर जिल्ह्यातील डोमेल चौकातील पेट्रोल पंपाजवळ रात्री 10.30 च्या सुमारास घडली. या स्फोटात जवळपास उभ्या असलेल्या इतर वाहनांचेही नुकसान झाले आहे. जखमींना उधमपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. तपास सुरू आहे.

उधमपूरचे डीआयजी रियासी रेंज सुलेमान चौधरी ( DIG Reasi Range Suleman Choudhary ) यांनी सांगितले की, रात्री 10.30 च्या सुमारास हा स्फोट झाला. या घटनेत दोन जण जखमी झाले असून शेजारी उभ्या असलेल्या वाहनांचेही नुकसान झाले आहे. स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आम्ही प्रकरणाचा तपास करत आहोत.

सविस्तर बातमी प्रतिक्षेत...

ABOUT THE AUTHOR

...view details