नवी दिल्ली: भारतातील आपल्या प्लॅटफॉर्मवर चाइल्ड पोर्नोग्राफीच्या प्रसारामुळे मोठ्या वादाला तोंड देत असलेल्या ट्विटरने मोठी कारवाई केली ( Twitters Action On Child Porn ) आहे. ट्विटरने 26 जुलै ते 25 ऑगस्ट दरम्यान देशातील 57,643 खात्यांवर बंदी घातली ( 57643 Twitter Accounts Ban in India ) आहे. देशात लहान मुलांचे लैंगिक शोषण, असहमती नग्नता आणि संबंधित कंटेट जाहिरातीविरोधात हे पाऊल उचलल्याचे ट्विटरने म्हटले आहे.
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल ( Delhi Commission for Women Chairperson Swati Maliwal ) यांनी म्हटले होते की, चाइल्ड पोर्नोग्राफीच्या तक्रारींवर ट्विटरवरून मिळालेले प्रतिसाद अपूर्ण आहेत. त्यामुळे आयोग त्यांच्यावर समाधानी नाही. मालीवाल यांनी 20 सप्टेंबर रोजी मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर चाइल्ड पोर्नोग्राफी ( Child pornography on microblogging platforms ) आणि महिला आणि मुलांवरील बलात्काराचे व्हिडिओ दर्शविणाऱ्या ट्वीट्सवर ट्विटर इंडिया पॉलिसी हेड आणि दिल्ली पोलिसांना समन्स बजावले होते.
लहान मुलांशी संबंधित लैंगिक कृत्यांचे खुलेआम व्हिडिओ आणि चित्रे दाखविणाऱ्या अनेक ट्विटची स्वत:हून दखल घेत आयोगाने म्हटले आहे की, बहुतांश ट्विटमध्ये मुलांना पूर्णपणे नग्न दाखवण्यात ( Completely nude video in tweets ) आले आहे. तसेच त्यातील अनेकांमध्ये लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे. क्रूर बलात्कार आणि इतर गैर-सहमतीने लैंगिक अत्याचारांसह क्रियाकलाप देखील चित्रित केले आहेत.