नवी दिल्ली -ट्विटरने राहुल गांधींचे ट्विटर अकाउंट शनिवारी पूर्ववत केले आहे. अकाउंट सुरू होताच राहुल यांनी सत्यमेव जयते हे दोन शब्द ट्विट केले आहेत. सोशल मीडिया कंपनी ट्विटरने काँग्रेसच्या नेत्यांचे ट्विटर अकाउंटही सुरू केले. ट्विटरने काँग्रेससह काँग्रेस नेत्यांची ट्विटर अकाउंट बंद केल्याने सोशल मीडिया कंपनीच्या वादाच्या भोवऱ्यात पडली आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बलात्कार पीडितेच्या आई-वडिलांबरोबरील फोटो हा ट्विट केला होता. त्यामुळे ट्विटरने त्यांचे अकाउंट बंद केले होते. राहुल गांधींचे अकाउंट अनलॉक करण्यात आल्याचे काँग्रेसच्या नेत्याने म्हटले आहे. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस नेत्यांचे ट्विटर अकाउंट सुरू झाल्यानंतर काही काँग्रेस नेत्यांनी #Speak Up against Twitter's hypocrisy हा हॅशटॅग चालविला आहे.
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Maharashtra Congress State President Nana Patole) यांनी गुरुवारी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा-Twitter India : ट्विटरचे एमडी मनीष माहेश्वरी यांची उचलबांगडी; नवीन जबाबदारीसह पाठवले अमेरिकेत
'ट्विटरवर मोदी सरकारचा दबाव'
'काँग्रेस सातत्याने सामान्य लोकांचा आवाज उठवत आहे. तो आवाज दाबण्यासाठी ट्विटरवर केंद्र सरकारने दबाव आणला आहे. त्यामुळेच काँग्रेसच्या नेत्यांचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आले आहे', असा आरोप नाना पटोले (nana patole) यांनी केला आहे.
'जाब विचारून जेरीस आणल्याने मोदी सरकारचा ट्विटरवर दबाव'
'काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी (congress leader rahul gandhi) यांचे ट्विटर अकाऊंट बंद (twitter account closed) करण्यात आले. त्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस पक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षासह देशभरातील काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आले आहे. ट्विटरची ही कारवाई पक्षपातीपणाची आहे. केंद्रातील मोदी सरकारला जाब विचारणारे ट्विट करून जेरीस आणल्यामुळेच मोदी सरकारच्या दबावाखाली ट्विटरने ही कारवाई केली आहे. या कारवाईचा काँग्रेस पक्ष निषेध करत आहे. कोणत्याही दबावापुढे न झुकता लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस पक्ष आवाज उठवतच राहिल', असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
हेही वाचा-गोव्याच्या सांत जासिंतो बेटावरील कृत्याचा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला निषेध
एका काँग्रेस नेत्याने म्हटले, की ट्विटरने जबाबदारी दाखवावी, अशी लोकांची मागणी आहे. आम्ही केवळ बलात्कार पीडितेला न्याय मिळावा, अशी साधी मागणी केली होती. तुम्ही मोदी सरकारला घाबरत आहात. त्यामुळे आमच्या राजकारणात हस्तक्षेप करू नये. मोदी सरकारच्या दबावामधून आमचा दाबण्याचे थांबवावा, अशी आमची ट्विटरकडे मागणी आहे. भाजपपासून घाबरू नये. न्यायाची मागणी करणारे सर्व अकाउंट पूर्ववत करावीत, असेही काँग्रेस नेत्याने म्हटले आहे.
हेही वाचा-स्वातंत्र्यदिन विशेष : बिलासपूरचे 'हे' कुटुंब दररोज का फडकावते तिरंगा?
ट्विटरचा राष्ट्रीय राजकारणात हस्तक्षेप
ट्विटर हे राष्ट्रीय राजकारणात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष गांधी यांनी केला. ट्विटर हा धोकादायक खेळ खेळत आहे, असेही राहुल गांधी यांनी युट्यूबवरील व्हिडिओमध्ये म्हटले आहे. लाखो फॉलोअर्सला मत व्यक्त करण्याचा अधिकार नाहीत. हे चुकीचे आहे. ट्विटर हे प्रत्यक्षात तटस्थ माध्यम नाही. हे पक्षपाती माध्यम आहे. सरकार काय म्हणते, हे ट्विटर ऐकत आहे.
ट्विटर इंडियाचे एमडी मनीष माहेश्वरी यांची बदली-
ट्विटर हे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले असताना ट्विटरने कंपनीचे भारतीय प्रमुख मनीष माहेश्वरी यांची अमेरिकेत बदली केली आहे. धार्मिक तेढ वाढविणारा व्हिडिओ ट्विटवरून व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर गाझियाबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहेश्वरी यांची कोणत्या कारणाने बदली झाली, हे ट्विटरने जाहीर केलेले नाही. मात्र, मनीष माहेश्वरी यांना वरिष्ठ पदावर बढती देण्यात आली आहे.