हैदराबाद:ट्विटरने गुरुवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि त्याचे नवीन मालक एलोन मस्कबद्दल ( Twitter suspends journalist accounts ) लिहीणार्या पत्रकारांची खाती निलंबित केली. ज्यात न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट, सीएनएन आणि इतर पत्रकारांचा समावेश आहे. ट्विटरने या पत्रकारांची खाती का काढली आणि त्यांचे प्रोफाइल का हटवले याचे स्पष्टीकरण दिलेले नाही.
खासगी आयुष्यावर लक्ष :एलोन मस्कच्या ( Elon Musk ) खाजगी जेटच्या उड्डाणाविरोधाची माहिती काही पत्रकारांनी दिली होती. ती माहिती देणार्या पत्रकारांच्या खात्यावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे. ट्विटरने बुधवारी देखील त्यांचे नियम बदलून दुसर्यांच्या खाजगी आयुष्याविषयी संमतीशिवाय माहिती शेअर करण्यास मनाई केली. गुरुवारी रात्री निलंबित करण्यात आलेल्या अनेक पत्रकारांनी त्या नवीन धोरणाबद्दल आणि ते लादण्याच्या मस्कच्या तर्काबद्दल लिहिले. ज्यात लॉस एंजेलिसमध्ये असताना पत्रकारांनी त्याविषयी काहीतरी लिहीले होते. ज्याचा मंगळवारी रात्री त्याच्या कुटुंबावर परिणाम झाला. त्या घटनेवर मस्क यांनी गुरुवारी ट्विट केले, “दिवसभर माझ्यावर टीका करणे पूर्णपणे ठीक आहे, परंतू मी जिथे आहे. तिथले माझ्या खासगी आयुष्यावर जर नजर ठेवली जात असेल ( journalists wrote about Elon Musk ) आणि त्यामुळे माझे कुटुंब धोक्यात येत असेल तर ते योग्य नाही.”