महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Twitter CEO Elon Musk : इलॉन मस्क यांना 2018चे ट्विट पडले महागात ; मोजावी लागली अब्जावधींची किंमत - Elon musk admits to ignoring investors

ट्विटरचे सीईओ इलॉन मस्क यांनी अमेरिकेच्या न्यायालयात कबूल केले की त्यांनी टेस्लासाठी निधी उभारण्यात गुंतवणूकदारांकडे दुर्लक्ष केले. खरं तर, मस्कने 2018 मध्ये टेस्ला कंपनीबाबत एक वादग्रस्त ट्विट केले होते, ज्यामुळे त्यांना कोट्यवधींचे नुकसान होत आहे.

Twitter CEO Elon Musk
ट्विटरचे सीईओ इलॉन मस्क

By

Published : Jan 22, 2023, 10:30 AM IST

सॅन फ्रान्सिस्को : इलॉन मस्क यांनी अमेरिकेच्या न्यायालयात कबूल केले आहे की, 2018 मध्ये टेस्ला निधी सुरक्षित करण्याबद्दल ट्विट करताना त्यांनी आपल्या सल्लागार आणि गुंतवणूकदारांकडे दुर्लक्ष केले. टेस्ला घेण्याबाबत मस्कच्या 2018 च्या वादग्रस्त ट्विटमुळे त्यांना अब्जावधींचा खर्च आला. त्यांनी आपल्या हिंतचिंतकाच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले आहे का ? असे विचारले असता, टेस्ला गुंतवणूकदारांच्या चालू असलेल्या क्लास-अ‍ॅक्शन खटल्यात शुक्रवारी कोर्टाच्या सुनावणी दरम्यान मस्क यांनी कबूली दिली.

वादग्रस्त ट्विटमुळे अब्जावधींचा खर्च :अब्जाधीशांना त्याचे ट्विट आणि टेस्लाचे किरकोळ गुंतवणूकदार यांच्यातील संबंध स्पष्ट करण्यास सांगितले होते, असे माध्यमांनी सांगितले आहे. त्यांनी न्यायालयाला सांगितले की, मला किरकोळ गुंतवणूकदारांची खूप काळजी आहे. आमचे सर्वात निष्ठावान आणि स्थिर गुंतवणूकदार आहेत. शॉर्ट सेलिंग बेकायदेशीर ठरवावे, असे ते म्हणाले. मस्क म्हणाले माझ्या मते, वॉल स्ट्रीटवरील वाईट लोकांसाठी लहान गुंतवणूकदारांचे पैसे चोरण्याचे हे एक साधन आहे. जे चांगले नाही

फसवणुकीच्या आरोपांवर तोडगा : मस्कने ऑगस्ट 2018 मध्ये ट्विट केले की, ते टेस्ला 420 डॉलरमध्ये घेण्याचा विचार करत आहेत. ते म्हणाले, भागधारक एकतर 420 डॉलरवर विकू शकतात किंवा शेअर्स ठेवू शकतात. त्यांचा निधी सुरक्षित आहे. त्यांच्या ट्विटची त्यांना टेस्लाचे अध्यक्ष म्हणून किंमत मोजावी लागली. ऑगस्ट 2018 च्या ट्विटमुळे मस्क आणि टेस्ला यांनी युएस एसईसीसोबत फसवणुकीच्या आरोपांवर तोडगा काढला. सेटलमेंटमध्ये 40 दशलक्ष दंड समाविष्ट होता. कंपनी आणि मस्क यांच्यात समान रीतीने विभाजन झाले आणि मस्क यांना टेस्ला बोर्डाच्या अध्यक्षपदावरून काढून टाकण्यात आले.

सोशल मीडिया साइट्सची निष्काळजी :एका संशोधनातून समोर आले आहे की, फेसबुक आणि ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वापरकर्त्यांना माहिती शेअर करण्यासाठी रिवार्ड्स देण्याची सवय चुकीची माहिती आणि खोट्या बातम्या पसरवित आहे. युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियाने केलेल्या अभ्यासात असे सुचवले आहे की, ऑनलाइन चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यात प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांपेक्षा मोठी भूमिका बजावतात. प्रोसीडिंग्ज ऑफ नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या निष्कर्षांनुसार, संशोधनात केवळ 15 टक्के टॉप न्यूज शेअर्स 30 ते 40 टक्के फेक न्यूज पसरवण्यासाठी जबाबदार आहेत.

हेही वाचा : Twitter New Feature : आता ट्विटर होणार युजर फ्रेंडली, जाणून घ्या काय आहेत नवीन फीचर

ABOUT THE AUTHOR

...view details