महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'कहानी' में नया ट्वीस्ट! मी नाक फोडलंच नाही, उलट महिलेने शिवीगाळ केली, डिलीव्हरी बॉयचा दावा - scuffle with Zomato

ग्राहक आणि डिलीव्हरी बॉय यांच्यात झालेल्या भांडणामुळे आता पुन्हा झोमॅटो चर्चेत आले आहे. जेवण ऑर्डर करुन ते कॅन्सल केल्यामुळे डिलीव्हरी बॉयने मारहाण केल्याचा दावा एका महिलेने केला होता. पोलिसांनी संबंधित डिलीव्हरी बॉयला अटकही केली होती. मात्र, संबधित डिलीव्हरी बॉयने महिलेचा दावा नाकारला. तर ऑर्डर पोहचण्यास उशीर झाल्याने महिलेनेच आपल्याला शिवीगाळ केल्याचे त्याने सांगितले.

झोमॅटो
झोमॅटो

By

Published : Mar 12, 2021, 1:34 PM IST

बंगळुरू -फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो सोशल मीडियावर आपल्या पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते. ग्राहक आणि डिलीव्हरी बॉय यांच्यात झालेल्या भांडणामुळे आता पुन्हा झोमॅटो चर्चेत आले आहे. जेवण ऑर्डर करुन ते कॅन्सल केल्यामुळे डिलीव्हरी बॉयने मारहाण केल्याचा दावा एका महिलेने केला होता. पोलिसांनी संबंधित डिलीव्हरी बॉयला अटकही केली होती. मात्र, संबधित डिलीव्हरी बॉयने महिलेचा दावा नाकारला. तर ऑर्डर पोहचण्यास उशीर झाल्याने महिलेनेच आपल्याला शिवीगाळ केल्याचे त्याने सांगितले.

महिलेची बाजू -

जेवण ऑर्डर करुन ते कॅन्सल केल्यामुळे डिलीव्हरी बॉयने मारहाण केल्याचा दावा हितेशा चंद्राणी नावाच्या एका महिलेने व्हिडिओ शेअर करत केला होता. महिलेच्या म्हणण्यानुसार, त्यांनी 9 मार्चला 3.30 वाजता ऑर्डर प्लेस केली. मात्र, त्यांना ही ऑर्डर 4.30 वाजता मिळाली. ऑर्डर वेळेवर न मिळाल्यामुळे महिलेने झोमॅटो कस्टमर केअरला कॉल करत तक्रार केली. ऑर्डर रद्द करावी आणि पैसे परत द्यावे, अशी त्यांनी कस्टमर केअरकडे मागणी केली. त्यांनी डिलीव्हरी बॉयला ऑर्डर रद्द करण्यास सांगितले. तेव्हा तो त्यांच्यावर ओरडला. यामुळे त्या घाबरल्या आणि त्यांनी दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला. यावेळी डिलीव्हरी बॉय घरात घुसला आणि आर्डर ठेवली. या प्रकाराचा महिलेने विरोध केल्यावर त्याने रागात महिलेच्या नाकावर मारले, असा दावा महिलेने एका व्हिडिओत केला आहे.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्या डिलीव्हरी बॉयला अटक केली . झोमॅटोनं त्याला कामावरुन देखील हटवलं आहे. कामराज असं त्या झोमॅटो डिलीव्हरी बॉयचं नाव आहे. मात्र, चौकशीदरम्यान या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले.

डिलीव्हरी बॉयची बाजू -

मी ऑर्डर घेऊन त्यांच्या दारावर पोहचलो. तेव्हा वाहतूक, खराब रस्त्यांमुळे ऑर्डर देण्यास उशीर झाल्याचे मी त्यांना सांगितले. तसेच माफी मागितली आणि पार्सल दिलं. त्यांनी कॅश ऑन डिलिव्हरी पेमेंट पर्यायाची निवड केल्यामुळे मी पेंमटची वाट पाहत होतो. मात्र, त्यांनी पार्सल घेतल्यानंतर पैसे देण्यास नकार दिला. त्यांनी झोमॅटो सपोर्टशी बोलून ऑर्डर रद्द केली. त्यानंर ग्राहकांच्या विनंतीवरून ऑर्डर रद्द करण्यात आल्याचे झोमाटो सपोर्टने मला सांगितले. मग मी त्यांना पार्सल परत करण्यास सांगितले. पण त्यांनी नकार दिला. यानंतर मी पार्सल न घेताच जाण्याचे ठरविले आणि लिफ्टकडे निघालो. मात्र, यावेळी त्यांनी मला शीवगाळ करत चप्पलनं मारहाण केली. यावेळी त्याच्याच हातातील अंगठी त्यांच्या नाकावर लागली. व्हिडिओमधील जखमकडे निरखून पाहिल्यास ती आंगठीची जखम असल्याचे लक्षात येईल. मी कोणती अंगठीसुद्धा घातलेली नव्हती.हे काम मी गेली दोन वर्षांहून अधिक काळापासून करत आहे. मात्र, अशी परिस्थिती पहिल्यांदाच उद्भवली. दरम्यान हितेशा यांच्या हातात आंगठी असल्याचे व्हिडिओत दिसते.

हेही वाचा -'पक्षाने पाकिस्तानच्या उमेदवाराला उभं केलं तरी त्यांच्या विजयासाठी काम करेल'; तृणमूलच्या नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

ABOUT THE AUTHOR

...view details