महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Twin Tower Demolish Today नोएडातील ट्विन टॉवर पाडण्याची तयारी पूर्ण, परिसर खाली करण्याच्या पोलिसांच्या सूचना - प्राण्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न

नोएडातील ट्विन टॉवर रविवारी पाडण्यात येणार Twin Tower Demolish Today आहेत. त्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. नोएडा येथील सेक्टर 93A मधील सुपरटेक ट्विन टॉवर्सच्या आजूबाजूचा परिसर रिकामा करण्याची घोषणा पोलिसांनी केली. मोठमोठ्या क्रेन येथे येऊ लागल्या आहेत. त्याच बरोबर एनजीओ मार्फत जनावरांची देखील विध्वंस करण्यापूर्वी सुटका केली जात असून त्यामुळे त्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. यासोबतच इमारतीतील बारूद उंदरांकडून इजा होणार नाही, याचीही विशेष काळजी घेतली जात आहे.

Twin Tower Demolish Today
Twin Tower Demolish Today

By

Published : Aug 28, 2022, 8:01 AM IST

नोएडाप्रसिद्ध इमारत ट्विन टॉवर पाडण्यासाठी सर्व तयारी पूर्ण Twin Tower Demolish Today झाली आहे. त्यासाठी सर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आल्या आहेत. मोठमोठ्या क्रेन येथे येऊ लागल्या आहेत. स्थानिक पोलिसांनी हा संपूर्ण परिसर रिकामा करणाच्या सूचना दिल्या आहेत. ट्विन टॉवर पाडण्याच्या पूर्ण येथील प्राण्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला. त्याची जबाबदारी एका एनजीओने घेतल्याचे सांगण्यात आले.

एडफिस कंपनीसमोर ट्विन टॉवरपाडण्याबाबत एक नवी समस्या निर्माण झाली आहे आणि ती म्हणजे प्राण्यांची. एकीकडे इमारतीत उपस्थित असलेल्या विविध प्राण्यांना वाचवल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे ट्विन टॉवरमधील गनपावडरला जोडणाऱ्या वायरला उंदीर चावण्याची भीती आहे. यासाठी एक एनजीओ ऑपरेटर संजय महापात्रा यांच्याकडे टॉवरमध्ये कोणत्याही प्रकारचे प्राणी राहू नयेत याची काळजी घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

यासंदर्भात एनजीओचे संचालक संजय यांनी सांगितलेकी, ते संस्थेच्या लोकांसह गेल्या ८ ऑगस्टपासून ट्विन टॉवरमध्ये जाऊन प्राण्यांच्या अस्तित्वाचा शोध घेत आहेत. त्याचा अंतिम अहवाल पाडण्यापूर्वीच दिला जाईल. त्यांच्यासोबत एडिफिस कंपनीचे एक पथकही असून ते इमारतीच्या आजूबाजूला कोणी प्राणी येत नाही ना, याची रात्रंदिवस बारकाईने तपासणी करत आहे. इमारत पाडण्यापूर्वी प्राणीप्रेमींना येथे बोलावण्यात आले होते, जेणेकरून त्यांनी अधिकाधिक प्राण्यांना इमारतीतून बाहेर काढावे. यासोबतच ट्विन टॉवर्सच्या आसपास कोणताही लहान-मोठा प्राणी येऊ नये यासाठी प्रत्येक पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे रविवारी एम्ब्राल्ड ते एटीएस टॉवर दरम्यान असलेला ट्विन टॉवर एडिफिस कंपनी पाडणार आहे. सुरक्षितपणे पाडण्यासाठी ट्विन टॉवर्सच्या आजूबाजूला काही अंतरापर्यंत नागरिक आणि वाहनांची ये-जा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. पोलिसांनी नागरिकांना हा परिसर पूर्णपणे रिकामा करण्याच्या सूचना दिल्या आहते.

  • ट्विन टॉवर पाडण्याची तयारी पूर्ण
  • एनजीओकडून प्राण्यांच्या सुरक्षिततेची काळजी
  • उंदरांपासून वायरींचे संरक्षण करण्यासाठी घेणार दक्षता
  • परिसर खाली करण्याच्या पोलिसांच्या नागरिकांना सूचना
  • मोठ्या मोठ्या क्रेन ट्विन टॉवर परिसरात दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details