महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

twin tower demolish today noida ट्विन टॉवरमधील प्राण्यांना वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा - ट्विन टॉवर

नोएडातील ट्विन टॉवर Twin Towers रविवारी पाडणार twin tower demolish today आहेत. त्यासाठी कंपनीकडून सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच बरोबर एनजीओ मार्फत जनावरांची देखील सुटका केली जात आहे. येथील प्राण्यांना वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. यासोबतच इमारतीमध्ये लावलेली स्फोटके उंदरांकडून कुरतडली जाणार नाहीत, याचीही काळजी घेतली जात आहे. यासाठी वापरलेल्या वायरींना उंदरांपासून बचावासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. Special protection from rats twin tower

twin tower demolish today noida
twin tower demolish today noida

By

Published : Aug 28, 2022, 9:48 AM IST

नोएडायेथील प्रसिद्ध इमारत ट्विन टॉवर Twin Towers पाडण्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे. त्यासाठी सर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आल्या आहेत. मात्र, आज एडफिस कंपनीसमोर ट्विन टॉवर Twin Towers पाडण्याबाबत एक नवी समस्या निर्माण झाली आहे आणि ती म्हणजे प्राण्यांची. एकीकडे इमारतीत उपस्थित असलेल्या विविध प्राण्यांना वाचवल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे ट्विन टॉवरमधील Twin Towers गनपावडरला जोडणाऱ्या वायरला उंदीर कुरतडण्याची भीती आहे. त्यासाठी विशेष काळजी Special protection from rats twin tower घेतली जात आहे. यासाठी एक एनजीओ ऑपरेटर संजय महापात्रा यांच्याकडे टॉवरमध्ये कोणत्याही प्रकारचे प्राणी राहू नयेत याची काळजी घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

नोएडातील ट्विन टॉवर आज पाडणार

यासंदर्भात एनजीओचे संचालक संजय महापात्रायांनी सांगितले की, ते संस्थेच्या लोकांसह गेल्या ८ ऑगस्टपासून ट्विन टॉवरमध्ये जाऊन प्राण्यांच्या अस्तित्वाचा शोध घेत आहेत. त्याचा अंतिम अहवाल पाडण्यापूर्वी दिला जाईल. त्यांच्यासोबत एडिफिस कंपनीचे एक पथकही असून ते इमारतीच्या आजूबाजूला कोणी प्राणी येत नाही ना, याची बारकाईने तपासणी करत आहेत. इमारत पाडण्यापूर्वी प्राणीप्रेमींना येथे बोलावण्यात आले होते, जेणेकरून त्यांनी अधिकाधिक प्राण्यांना इमारतीतून बाहेर काढावे. यासोबतच ट्विन टॉवर्सच्या Twin Towers आसपास कोणताही लहान मोठा प्राणी येऊ नये यासाठी पूर्ण काळजी घेतली जात आहे.

रविवारी एम्ब्राल्ड आणि एटीएस टॉवरदरम्यान असलेला ट्विन टॉवर Twin Towers एडफिस कंपनी पाडणार आहे. सुरक्षितपणे पाडण्यासाठी ट्विन टॉवरच्या आजूबाजूला काही अंतरापर्यंत नागरिक आणि वाहनांची ये-जा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. पोलिसांनीही हा परिसर रिकामा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हा परिसर सील करण्यात आला आहे.

हेही वाचाMLA Rohit Pawar Investigated by ED ग्रीन एकर कंपनीच्या ईडी चौकशीबाबत आमदार रोहित पवार यांनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

ABOUT THE AUTHOR

...view details