महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

TV Actress Suicide : अभिनेत्री वैशाली ठक्करने का आत्महत्या केली? चिठ्ठीतून सत्य आले बाहेर - इंदौरमध्ये अभिनेत्री वैशाली ठक्करची आत्महत्या

इंदूरची प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्कर हिने गळफास लावून आत्महत्या केली (Vaishali Thakkar committed suicide in Indore) आहे. नातेवाईकांच्या माहितीवरून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मृतदेहाचे पोस्टमार्टमही करण्यात आले आहे. वैशालीने लिहिलेली रोजची डायरीही पोलिसांना सापडली असून त्यात अनेक गुपिते लिहिली (TV actress Vaishali Thakkar) आहेत.

TV Actress Suicide
अभिनेत्री वैशाली ठक्कर गळफास घेऊन आत्महत्या

By

Published : Oct 17, 2022, 10:32 AM IST

इंदौर (मध्य प्रदेश) : शहरातील तेजाजी नगर पोलीस स्टेशन परिसरात राहणारी टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्कर (TV actress Vaishali Thakkar) हिने गळफास घेऊन आत्महत्याकेली आहे. ३० वर्षीय वैशालीचा मृतदेह इंदूरच्या साईबाग कॉलनीतील तिच्या घरी आढळून आला. अभिनेत्रीने सुसाईड नोटही टाकली असून, त्यात तिने प्रेमप्रकरणातून असे पाऊल उचलल्याचे कारण सांगितले (Vaishali Thakkar committed suicide in Indore)आहे. पोलिसांनी वैशालीचा मृतदेह शवविच्छेदन करून कुटुंबीयांच्या ताब्यात दिला होता. यानंतर कुटुंबीयांसह शहरातील शेकडो नागरिकांनी वैशाली यांच्या अंत्ययात्रेला हजेरी लावली. सुसाईड नोटच्या आधारे पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

गळफास घेऊन आत्महत्या - प्राथमिक तपासाच्या आधारे पोलिसांनी सांगितले की, वैशालीने शनिवारी रात्रीच आत्महत्या केली. सकाळी कुटुंबीयांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना घटनास्थळावरून 8 पानी सुसाईड नोट सापडली आहे. पोलिसांना 7 तासांनंतर घटनेची माहिती मिळाली. त्यामुळे आता सुसाईड नोटचा तपास हस्ताक्षर तज्ज्ञांकडून केला जाणार (Vaishali Thakkar committed suicide by hanging) आहे.

ती सुसाईड नोट -सुसाईड नोटमध्ये वैशालीने दोन मुला-मुलींची नावेही लिहिली आहेत. त्यांना शिक्षा होईल, असे सांगितले जाते. वैशालीच्या सुसाईड नोटच्या आधारे इंदूरचे एसीपी एम. रहमान यांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशाली ठक्कर हिचा शेजारी राहणाऱ्या एका मुलाकडून छळ केला जात होता. यामुळे तिने आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. वैशाली लग्न करणार होती. परंतु या मुलाने स्वतः वैशालीशी लग्न करावे, म्हणून तिचे लग्न मोडले होते. वैशालीच्या आत्महत्येपासून तो मुलगा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत (actress Vaishali Thakkar committed suicide) आहेत.

डायरीत 'त्या' मुलाचा उल्लेख - पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. यासाठी पोलीस वैशालीच्या घरी पोहोचले आणि त्यांनी अभिनेत्रीने नियमितपणे लिहिलेली डायरी जप्त केली. यामध्ये वैशाली रोजच्या दिनक्रमाची माहिती लिहायची. याच डायरीत त्या शेजारील तरुणाचीही माहिती दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details