नवी दिल्ली - लाल किल्ल्याकडे जाणारा एक बोगदा दिल्ली विधानसभेच्या आत आहे. हा बोगदा सामान्य लोकांसाठी खुला करण्यात येणार आहे. बोगद्याच्या इतिहासाबद्दल स्पष्टता नाही. मात्र, ब्रिटिशांनी हा बोगदा वापरला असावा, असे दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष राम निवास गोयल म्हणाले.
दिल्ली विधानसभेच्या आतील (लाल किल्ल्याकडे जाणारा) बोगदा सामान्य लोकांसाठी खुला करण्यात येणार आहे. पर्यटन विभागाला शनिवारी आणि रविवारी लोकांना विधानसभेत आणण्याची परवानगी देण्यात येणार आहे. त्यानुसार विधानसभेची रचना तयार करण्यात येत आहे. येत्या 26 जानेवरी किंवा 15 ऑगस्टपर्यंत हा लोकांसाठी खुला होईल, असे राम निवास गोयल यांनी सांगितले.