हैदराबाद :हिंदू धर्मात कार्तिक महिन्यातील एकादशीला देवूठाणी एकादशी साजरी केली जाते. या दिवशी तुळशी आणि शालिग्राम यांचा विवाह लावला जातो. काही लोक कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला तुळशीविवाह करतात. त्यामुळं 2023 मध्ये 23 नोव्हेंबर आणि 24 नोव्हेंबर असे दोन दिवस तुळशी विवाहाचं आयोजन करता येणार आहे. हिंदू धर्मात तुळशी विवाहाला खूप महत्त्व आहे. असं केल्यानं कन्यादानासारखे पुण्य मिळतं आणि घरात सुख, समृद्धी येते असं मानलं जातं. जाणून घेऊया तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त, साहित्य सूची आणि पूजा पद्धती...
तुळशी विवाहासाठी शुभ मुहूर्त:
- देवूठाणी एकादशीच्या दिवशी तुळशीविवाहाचा शुभ मुहूर्त: या वर्षी 22 नोव्हेंबरला कार्तिक महिन्याच्या एकादशीला रात्री 11:03 वाजता सुरूवात होईल आणि 23 नोव्हेंबरला रात्री 9 वाजता समाप्त होईल. त्यामुळे उदयतिथीप्रमाणे 23 नोव्हेंबरला देवूठाणी एकादशी साजरी केली जाणार आहे. या दिवशी सायंकाळच्या पूजेची वेळ संध्याकाळी 6.50 वाजता सुरू होईल आणि रात्री 8.09 वाजता संपेल.
- द्वादशी तिथीला तुळशीविवाहाचं आयोजन : कार्तिक महिन्यातील द्वादशी तिथीला बहुतेक लोक तुळशी विवाहाचं आयोजन करतात. यावर्षी कार्तिक मासातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी 23 नोव्हेंबर रोजी रात्री 9.01 वाजता सुरू होईल आणि 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.06 वाजता समाप्त होईल. या दिवशी प्रदोष कालचा शुभ मुहूर्त संध्याकाळी ५.२५ ते ६.०४ पर्यंत आहे.
- तुळशी विवाहाच्या साहित्याची यादी : हळद, शालीग्राम, गणेशमूर्ती, श्रृंगाराचं साहित्य, विष्णूजी मूर्ती, बताशा, फळे, फुले, धूप-दीप, हळद, हवन साहित्य, ऊस, लाल ओढणी, अक्षता, रोळी, कुमकुम, तीळ. तूप, आवळा, मिठाई, तुळस यासह पूजेसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी नक्की गोळा करा.