त्रिशूर (केरळ): Tuition teacher Arrested: केरळ पोलिसांनी सोमवारी सांगितले की, त्यांनी अल्पवयीन विद्यार्थ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी एका महिला शिकवणी शिक्षिकेला अटक केली Tuition teacher accused of molesting student आहे. पीडित मुलगा प्लस वनचा विद्यार्थी आहे. पोलिसांनी सांगितले की, "शिक्षिकेला 28 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती आणि आता ती न्यायालयीन कोठडीत आहे."
Tuition teacher Arrested: शिक्षिकेने शिकवणीला येणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांचा केला विनयभंग.. पोलिसांनी केली अटक - शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेला अटक
Tuition teacher Arrested: केरळमधील त्रिशूरमध्ये एका शिकवणी घेणाऱ्या महिला शिक्षिकेने अल्पवयीन विद्यार्थ्यांचा विनयभंग केल्याची घटना समोर आली Tuition teacher accused of molesting student आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.
पोलिसांनी सांगितले की, शाळेतील अधिकाऱ्यांना मुलाच्या वागण्यात बदल झाल्याचे लक्षात आले आणि त्यांनी त्याला समुपदेशनासाठी नेले. यावेळी त्याने घडलेला प्रकार सांगितला. यानंतर शाळा प्रशासनाने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी मुलांवर लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.
दारू पिऊन शिकवणी शिक्षकाने विनयभंग केल्याचे विद्यार्थ्याने पोलिसांना सांगितले. विनयभंगाचा हाच प्रकार अनेकवेळा घडल्याची भीती व्यक्त होत आहे. चौकशीत शिकवणी शिक्षिकेने गुन्ह्याची कबुली दिली आहे. शिक्षिकेने विद्यार्थ्याला तिच्या घरी रिसेप्शन पार्टीत दारू दिली. शिक्षिका पतीपासून विभक्त झाली आणि कोविडच्या काळात शिकवणी घेऊ लागली. यापूर्वी तिने फिटनेस सेंटरमध्ये ट्रेनर म्हणूनही काम केले आहे.