लखनौ -पुष्पक एक्सप्रेस रेल्वेचे तिकीट तपासनीस (टीसी) कोरोनाबाधित आढळले आहेत. यामुळे रेल्वेमधील प्रवासी आणि लखनौ रेल्वे स्थानकावरील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. टीसी आणि आणि त्याच्या पत्नीला 15 दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आले आहे. या घटनेमुळे रेल्वे प्रशासनाकडून इतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. रेल्वेमधील प्रवाशांची माहिती प्रशासनाला पाठवण्यात आली आहे.
भोपाळमधून बसलेले तिकीट तपासनीस दीपक मिश्रा 15 मार्चला लखनौ रेल्वे स्थानकातून मुंबईकडे रवाना झाले होते. तसेच मुंबई ते लखनौ पुष्पक एक्सप्रेसमध्येही त्यांची ड्युटी लावण्यात आली होती. त्यानंतर 17 मार्चला लखनौ स्थानकात ते पोहचले. प्रकृती बिघडल्याने त्यांना ऐशबाग पॉलीक्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. तेथून त्यांना बादशाहनगर रेल्वे स्थानकात हलवण्यात आले. रुग्णालयात दिपक यांच्यासह त्यांच्या पत्नीची कोरोना चाचणी करण्यात आली. कोरोना चाचणीत दोघेही बाधित आढळले आहेत. यानंतर रेल्वेतील प्रवाशांची माहिती प्रशासनाला पाठवण्यात आली असून त्यांना ट्रेसिंग करण्यात येत आहे.