हैदराबाद : काळी वर्तुळे आणि डोळ्यांवरील थकवा हे शब्द एकच असल्यासारखे जाणवतात. पण दोघांमध्ये थोडा फरक आहे. काळी वर्तुळे ही डोळ्यांखालील त्वचा काळी होण्यासंबंधी दर्शविली जाते. तर डोळ्यांवरील थकवा हा डोळ्यांभोवती सूज येण्याशी आणि डोळे निस्तेज दिसण्याशी संबंधित असतो. ताणतणाव, चिंता, बैठी जीवनशैली, पुरेशी झोप न लागणे या कारणांमुळे काळी वर्तुळे येतात, असे नाही. तर यामागे आणखी काय कारणे आहेत, ते जाणून घेऊया.
इतरही कारणे : अॅलर्जी, मिठाचे अतिसेवन, धुम्रपान, अल्कोहोलचे सेवन, अपरिपूर्ण आहार आणि सायनसच्या तीव्र समस्या हे अशा त्रासास कारणीभूत ठरणारे अतिरिक्त घटक आहेत. यापासून मुक्त होण्यासाठी, खाली नमूद केलेले घरगुती उपाय योग्य सावधगिरीने वापरु शकता. मात्र कोणताही नवीन उपाय करण्यापूर्वी लक्षात ठेवा, परिणाम भिन्न असू शकतात आणि कोणतेही उपाय चेहऱ्यावर अवलंबण्यापुर्वी ते पॅच (अल्प) स्वरुपाने हातावर किंवा शरीराच्या इतर भागावर लावुन बघा. त्यावेळी जर का काही वेळाने तुम्हाला त्याचे रिॲक्शन झाले नाही, म्हणजेच खाज सुटली नाही किंवा तेवढी त्वचा लालसर झाली नाही तर, मग तुम्ही ते डोळ्याजवळ अप्लाय करु शकता.
काकडी :काही कच्चे बटाटे किंवा काकडी किसून घ्या आणि त्याचे तुकडे डोळ्यांवर ठेवा. त्यानंतर आराम करा आणि 10-12 मिनिटांनंतर त्यांना काढून टाका. तसेच तुम्ही बटाटे किंवा काकडीचा रस देखील काढू शकता. त्यानंतर एक कापसाचा गोळा घ्या, तो रसात भिजवा आणि डोळ्यांवर ठेवा. काळ्या वर्तुळांच्या सभोवतालचा संपूर्ण भाग झाकलेला असल्याची खात्री करा. 1-3 मिनिटे राहू द्या आणि थंड पाण्याने स्वच्छ धुवा. जर तुम्हाला घाई असेल तर काकडी किंवा बटाट्याचे तुकडे थेट डोळ्यांवर ठेवा.