सवाई माधोपूररेल्वे स्थानकावर तृतीयपंथीयांचा त्रास दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शुक्रवारी मध्यरात्री अशाच त्रासामुळे एक दुर्दैवी घटना घडली. कोटा-हिसार पॅसेंजर ट्रेनमधून रिंगास येथे जाण्यासाठी तीन तरुण रेल्वेत चढले. मात्र, रेल्वेत असलेल्या तृतीयपंथीयांसोबत त्यांचे भांडण झाले. तृतीयपंथीयांच्या त्रासापासून स्वतःची सुटका करण्यासाठी तिघांनी रेल्वेतून उड्या ( Troubled By Eunuchs Two Brothers Jumped From Train ) घेतल्या. मात्र, दुसऱ्या ट्रॅकवरून त्याचवेळी वेगाने दुसरी रेल्वे गेली. या रेल्वेच्या धडकेत दोन तरुणांचा जीव गेला.
या संपूर्ण घटनेबाबतरेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे वेगळेच आहे. ही घटना तृतीयपंथीयांशी झालेल्या भांडणातून नव्हे तर चुकीच्या बाजूने ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नातून घडली आहे. तथापि, मृताचा सहप्रवासी अनिल याने सांगितले की, ते तिघे रात्री कोटा-हिसार पॅसेंजर ट्रेनने रिंगास येथे खाटू श्यामजी यांना भेटायला जात होते. सवाई माधोपूर रेल्वे स्थानकावर ट्रेनमध्ये चढताच त्यांना आत तृतीयपंथी दिसले. ट्रेनमध्ये शिरताच त्यांच्यात भांडण सुरू झाले. तृतीयपंथीयांना तिघांनाही ट्रेनमधून उतरण्यास भाग पाडले.