महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Tripura Polls 2023 : त्रिपुरात भाजपने उतरवली स्टार प्रचारकांची फौज, तर कॉंग्रेसच्या गोटात मात्र शुकशुकाट! - त्रिपुरा निवडणूक

त्रिपुरा विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. निवडणुकीत भाजपने आपल्या स्टार प्रचारकांची फौज उतरवली असताना काँग्रेसचा एकही मोठा नेता अद्याप प्रचारात दिसलेला नाही. प्रचाराची अंतिम तारीख १४ फेब्रुवारी असून राज्यात १६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे.

congress in Tripura election
त्रिपुरा विधानसभा निवडणूक

By

Published : Feb 13, 2023, 10:43 AM IST

आगरतळा (त्रिपुरा) : त्रिपुरा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता फक्त दोनच दिवस उरले आहेत. या 60 सदस्यीय विधानसभेच्या निवडणुकीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेस एकत्रितपणे निवडणूक लढवत आहे. त्रिपुरात आपली सत्ता टिकवण्यासाठी भाजपने स्टार प्रचारकांची फौज उतरवली आहे. परंतु काँग्रेसचा एकही प्रमुख नेता निवडणूक रॅली किंवा रोड शोमध्ये दिसला नाही. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांनी राज्यात आत्तापर्यंत एकही प्रचार रॅली केली नाही. राज्यात १६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे.

भाजपकडून घरोघरी प्रचार : पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह भाजपचे स्टार प्रचारक त्रिपुरामध्ये कोणतीही कसर सोडत नाहीत. अलिकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्रिपुरामध्ये दोन निवडणूक रॅलींना संबोधित केले होते. भाजप नेते राज्यात मोठ्या प्रमाणावर प्रचार करत असून अनेक रोड शो करत आहेत. राज्यात पूर्ण बहुमताने सत्ता राखण्यासाठी भाजपकडून घरोघरी जाऊन प्रचार केला जात आहे. त्रिपुरामध्ये प्रचाराची अंतिम तारीख १४ फेब्रुवारी असून राज्यात १६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे.

काँग्रेसचा जाहीरनामा : 60 सदस्यीय त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासोबत युती केली आहे. पक्षाने 13 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेसने त्रिपुरा विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना, ५०,००० नवीन नोकऱ्या, शेतमजुरांना पगारवाढ आणि पक्ष सत्तेत आल्यास १५० युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले होते. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात रोजगार, कर्मचाऱ्यांचे कल्याण आणि गरीब व मध्यमवर्गीयांवर भर दिला आहे.

भाजपचा जाहीरनामा :भारतीय जनता पक्ष ५५ जागांवर निवडणूक लढवत आहे. तर भाजपचा सहयोगी इंडिजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा (IPFT) पाच जागांवर निवडणूक लढवत आहे. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात गरिबांसाठी दिवसातून तीन वेळा विशेष कॅन्टीन जेवण, प्रत्येक वंचित कुटुंबाला 50,000 रुपयांचे मुलींच्या समृद्धी बाँड आणि महाविद्यालयीन मुलींसाठी स्कूटी अशा कल्याणकारी प्रस्तावांचे आश्वासन दिले आहे. भाजपने जाहीरनाम्यात 50,000 गुणवंत विद्यार्थ्यांना स्मार्टफोन, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना दोन एलपीजी सिलिंडर मोफत, कोणतीही धारण नसलेल्यांना जमिनीची कागदपत्रे आणि सर्व भूमिहीन शेतकऱ्यांना वार्षिक 3,000 रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. तृणमूल काँग्रेसने पक्षाचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला असून त्यांनी पाच वर्षांत दोन लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले आहे.

हेही वाचा :Earthquake In Sikkim : सिक्कीममध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 4.3 एवढी तीव्रता

ABOUT THE AUTHOR

...view details