मुंबई -कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हात धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे व मास्क हे गरजेचे आहे. कोरोना काळापासून मास्कचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे. बाजार विविध प्रकारचे रंगबेरंगी मास्क उपलब्ध आहेत. आता भारतीय बाजारात पारदर्शी मास्क उपलब्ध झाले आहे. मात्र, यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा कमी होणे, मोबाईल फेस अनलॉक करणे, चेहऱ्यावरील मेकअप खराब होणे, अशा विविध अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. त्याचबरोबर जे मुक बधिर आहेत, त्यांना मास्कमुळे समोरच्या व्यक्तीच्या म्हणणे त्यांच्या ओठाच्या हलचाली पाहू शकत नाही. या सर्व अडचणींवर उपाय म्हणून की मी या कंपनीने पारदर्शक मास्क ( Transparent Face Mask ) आता भारतीय बाजार उपलब्ध झाले आहे.
हे मास्क भारतातील एका शॉपिंग साइट व अॅपवर 2 हजार 990 रुपयांत उपलब्ध आहे. हे पारदर्शक ( Transparent Face Mask ) असून सुरक्षित मास्क आहे. स्वच्छ हवा व ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा यासाठी मास्कच्या खालच्या बाजूला N98+ ही फिल्टरयुक्त जाळी लावण्यात आली आहे. दूषित हवा दूर ठेवण्यासाठी नॉन अॅब्रेसिव्ह बेबी सॉफ्ट लिक्विड सिलिकॉन रबरचे सील या मास्कच्या आसपास लावण्यात आलेले आहेत. उच्च प्रतिचा कच्चा माल वापरल्याने ते मास्क दररोज स्वच्छ करुन आपण वापरू शकतो.