बालाघाट (मध्य प्रदेश) : जिल्ह्यातून मोठी घटना समोर आली आहे. बालाघाट जिल्ह्यातील लांजी पोलीस ठाण्यांतर्गत लोडगी चौकी परिसरात प्रशिक्षणार्थी विमान कोसळले आहे. या अपघातात विमानाचा वैमानिक आणि सहवैमानिकाला आपला जीव गमवावा लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लांजी येथील भक्कू टोला या नक्षलग्रस्त गावात ही घटना घडली.
महाराष्ट्रातून घेतले होते उडाण : बालाघाटमध्ये कोसळलेल्या प्रशिक्षणार्थी विमानाने महाराष्ट्रातील बिरसी हवाई पट्टीवरून दुपारी 2 वाजता उड्डाण केले होते. त्यानंतर काही वेळातच विमान कोसळले. प्राथमिक माहितीनुसार, बालाघाटमधील लांजी आणि किरणापूर पोलीस स्टेशन हद्दीतील भक्कुटोलाच्या टेकडीवर हे विमान कोसळले आहे. या अपघातात महिला प्रशिक्षणार्थी वैमानिक रुक्षंका आणि प्रशिक्षक मोहित यांचा मृत्यू झाला आहे.
दोन पायलट ठार :गोंदियाचे एटीसी एजीएम कमलेश मेश्राम यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, बालाघाट जिल्ह्यातील लांजी आणि किरणापूर दरम्यानच्या भक्कुटोला-कोसमरा टेकडीवर हा अपघात झाला. एटीसी गोंदियाचे एजीएम कमलेश मेश्राम यांनी सांगितले की, प्रशिक्षणार्थी पायलट रुक्षंका वरसुका आणि प्रशिक्षक मोहित यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे.