महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Bihar Train Accident : बिहारमध्ये मोठा रेल्वे अपघात, नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेस रुळावरून घसरली; आतापर्यंत 4 प्रवाशांचा मृत्यू

Bihar Train Accident : बिहारमध्ये काल रात्री एक भीषण रेल्वे अपघात झाला. बक्सरजवळील रघुनाथपूर रेल्वे स्थानकाजवळ नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेस सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या सहा बोगी येथे रुळावरून घसरल्या. यात आतापर्यंत 4 प्रवाशांचा मृत्यू झालाय.

Bihar Train Accident
Bihar Train Accident

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 11, 2023, 10:58 PM IST

Updated : Oct 12, 2023, 12:04 PM IST

नॉर्थ एस्ट एक्सप्रेसचे डबे घसरले

बक्सर (बिहार) Bihar Train Accident : बिहारमधील बक्सरमध्ये भीषण रेल्वे अपघात झाला आहे. येथे नॉर्थ ईस्ट सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन क्रमांक 12506 च्या सहा बोगी रुळावरून घसरल्या आहेत. रुळावरून घसरलेला कोच पुन्हा रुळावर आणण्यासाठी तांत्रिक पथक तातडीने रवाना झालीय. बक्सरच्या रघुनाथपूर रेल्वे स्थानकावर हा अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत 4 प्रवाशांचा मृत्यू झालाय. ही ट्रेन दिल्लीच्या आनंद विहार टर्मिनल येथून कामाख्याला जात होती.

हावडा-नवी दिल्ली मार्गावरील गाड्यांची वाहतूक विस्कळीत : ही गाडी बक्सर जंक्शनहून आराला निघाली असताना हा अपघात झाला. ही ट्रेन रघुनाथपूर रेल्वे स्थानकाजवळ रुळावरून घसरली. त्यानंतर इतर गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. या घटनेत किमान 50 प्रवासी जखमी झाले आहेत, याची माहिती मिळण्याची प्रतीक्षा आहे. या घटनेनंतर हावडा-नवी दिल्ली मार्गावरील गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

रेल्वे वाहतूक विस्कळीत : या अपघातामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अपघातामुळे मुख्य मार्गावरील अप आणि डाऊन अशा दोन्ही बाजूची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. सध्या या मार्गावर गाड्यांची वाहतूक बंद करण्यात आलीय. रुळावरून बोगीची व्यवस्था करण्यासाठी किती वेळ लागेल याबाबत सध्या कोणताही अधिकारी बोलण्यास तयार नाही. मात्र, प्रवाशांच्या मदतीसाठी आजूबाजूचे लोकही घटनास्थळी पोहोचले होते. रात्रभर बचाव कार्य केल्यांनंतर आता अपघातग्रस्त ट्रेनमधील प्रवाशांना दुसऱ्या ट्रेनने रवाना करण्यात आलंय.

सरकारनं जबाबदारी घ्यावी : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बिहारमधील बक्सर इथं झालेल्या रेल्वे अपघातावर शोक व्यक्त केलाय. तसंच अशा अपघाताची जबाबदारी रेल्वे मंत्रालय आणि केंद्र सरकारनं घेतली पाहिजे, असं म्हटलंय. खरगे यांनी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या आणि जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो अशी प्रार्थना केलीय. खरगे यांनी 'X' वर पोस्ट करत लिहिलंय की, 'नवी दिल्लीहून आसामकडं जाणारी नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेस बिहारच्या बक्सरमध्ये रुळावरून घसरल्याची बातमी अतिशय वेदनादायक आहे. या भीषण अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.'

हेही वाचा :

  1. Train Accident Conspiracy Foiled: मोठी दुर्घटना टळली, रेल्वे रुळावर आढळले मोठं मोठे दगड
  2. Udaipur Jaipur Vande Bharat : वंदे भारत एक्सप्रेस उलटवण्याचा प्रयत्न; ट्रॅकवर दगड अन् रॉड, पाहा व्हिडिओ
  3. Train Accident: चिंचवड-आकुर्डी दरम्यान रुळावर दगड; गुन्हा दाखल
Last Updated : Oct 12, 2023, 12:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details