झुंझुनू (राजस्थान): पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, झुंझुनूच्या उदयपुरवती परिसरात मानसा मातेचे दर्शन घेऊन हे लोक परतत होते. यावेळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भाविकांनी भरलेली ट्रॉली डोंगरावरून खोल दरीत कोसळली. या अपघातात 9 जणांना जीव गमवावा लागला.
जखमींना रुग्णालयात दाखल: जखमींना उदयपुरवती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ. खुशाल यादव, एसपी मृदुल कछावा हेही उदयपुरवती रुग्णालयात पोहोचले. जखमी भाविकांची अवस्था जाणून घेतल्यानंतर त्यांनी उदयपुरवती रुग्णालयाबाहेर थांबलेल्या जखमींच्या नातेवाईकांशी चर्चा करून त्यांना धीर दिला.
जखमींमध्ये महिलांची संख्या जास्त: जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. एकामागून एक रुग्णवाहिका रुग्णालयात पोहोचू लागल्या. जखमींमध्ये बहुतांश महिला आहेत. अपघात झाला तेव्हा सर्व भाविक मंदिराच्या दीड किमी पुढे आले होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मानसा माता मंदिरात दुर्गामातेची मूर्ती बसवण्यात आली आहे. त्यामुळे २४ मे पासून मंदिरात धार्मिक कार्यक्रम सुरू होते. सोमवारी मंदिरात मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा व अन्न प्रसादाचा कार्यक्रम होता. त्याच्या आजूबाजूच्या ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने लोक आले होते.