महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गोव्यात शंभर टक्के लसीकरण झाल्यावरच पर्यटन सुरू; 2 ऑगस्टपर्यंत कर्फ्यू - Tourism starts date in goa

कोविडचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारने लागू केलेल्या जनता कर्फ्यूमध्ये वाढ करण्यात आली आहे. कर्फ्यू 2 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पत्रकारांना दिली.

गोवा पर्यटन
गोवा पर्यटन

By

Published : Jul 26, 2021, 2:09 AM IST

पणजी- गोव्यामध्ये पर्यटनाकरिता जाण्याचे नियोजन असलेल्या नागरिकांकरिता महत्त्वाची बातमी आहे. कारण राज्यात शंभर टक्के लसीकरण पूर्ण झाल्यानंतरच पर्यटन सुरू करणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी स्पष्ट केले. दोन डोस घेणाऱ्यांनाच पर्यटकांना गोव्यात प्रवेश दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोविडचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारने लागू केलेल्या जनता कर्फ्यूमध्ये वाढ करण्यात आली आहे. कर्फ्यू 2 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पत्रकारांना दिली. तसेच सध्याच्या निर्बधमध्ये कोणताही बदल नसल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

हेही वाचा-'तालिबानी' शिक्षा! फोनवर बोलण्याच्या कारणावरून दोन मुलींना बेदम मारहाण

विकेंड पर्यटनासाठी लोकांची गोव्याला पसंती
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गोव्यातील पर्यटनाला खीळ बसली होती. बुडालेल्या पर्यटनाला पुन्हा उभारी देण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दोन डोस घेतलेल्या किंवा कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असणाऱ्या पर्यटकांना गोव्यात प्रवेश देण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे अनेक पर्यटकांनी गोव्याचा येऊन मौजमस्ती करण्यास पसंती दर्शवली. त्यामुळे या वीकेंडला पर्यटकांनी गर्दी केली होती. पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांना विचारणा केली असता राज्यातील जनतेचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण झाल्यावरच अधिकृतपणे पर्यटन सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा-हिमाचल प्रदेशमध्ये भूस्खलन; 9 पर्यटकांचा मृत्यू, तीन जण जखमी

काय आहेत सध्या राज्यातील निर्बंध?

  • सध्या राज्यातील सर्वच दुकाने संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी
  • पन्नास टक्के क्षमतेने व्यायामशाळा आणि क्रीडासंकुले चालू ठेवण्यास मुभा
  • अत्यावश्यक सेवा 24 तास सुरू
  • राज्यात सार्वजनिक वाहतूक सुरू

तूर्तास कॅसिनो आणि क्रूझ बंदच
सर्वाचं लक्ष लागून राहिलेल्या कॅसिनो सुरू करण्यास सरकारने अद्याप परवानगी दिली नाही. सोबतच क्रूझ तसेच वॉटर स्पोर्ट्स सुरू होण्यास पर्यटकांना अजून काही काळ वाट पहावी लागणार आहे.

राजकारण्यांनी सोशल डिस्टनसिंगचे वाजवले तीनतेरा
मागच्या काही दिवसांपासून भाजप, आपसह काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते गोव्यात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यात त्यांनी कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवत सभा व आंदोलनेही केली आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details