नवी दिल्ली -एकूण प्रजनन दर (TFR) प्रति स्त्री पुरुषांची सरासरी संख्या राष्ट्रीय स्तरावर 2.2 टक्क्यांवरून 2.0 पर्यंत घसरली असल्याची माहिती राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (National Family Health Survey) पाचव्या अहवालातून समोर आली आहे. केंद्र सरकारने (Center Government) बुधवारी हा डाटा प्रसिद्ध केला आहे. तसेच भारतातील जन्म दर कमी होत असल्याचेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
हेही वाचा -जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी
आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या अनेक अहवालांमध्ये असे सांगण्यात आले आहे की, पुढील 25 वर्षांत बालमृत्यूचे प्रमाण कमी होऊन आयुर्मान वाढल्याने भारताची लोकसंख्या वाढेल. परंतु जन्मदरात सातत्याने घट होत असल्याने एक वेळ अशी येईल की देशाची लोकसंख्या कमी होण्यास सुरुवात होईल.
- राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण डाटा प्रसिद्ध -
केंद्र सरकारने बुधवारी (24 नोव्हेंबर) 2019-21 NFHS च्या फेज दोन अंतर्गत एकत्रितपणे भारतासाठी लोकसंख्या, प्रजनन आणि बाल आरोग्य, कुटुंब कल्याण, पोषण आणि इतर प्रमुख निर्देशकांचे निष्कर्ष प्रसिद्ध केले. NHFS-5 च्या फेज एक आणि फेज दोनचा डेटा राष्ट्रीय स्तरावरील निष्कर्षांची गणना करण्यासाठी वापरला आहे.
नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. विनोद कुमार पॉल आणि भारत सरकारच्या केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी बुधवारी नवी दिल्लीत 14 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी 2019-21 चा राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणची (फेज -II) लोकसंख्या, प्रजनन आणि बाल आरोग्य, कुटुंब कल्याण, पोषण आणि अन्य संदर्भातील प्रमुख निर्देशकांची माहिती प्रसिद्ध केली.
- खालील राज्यांमध्ये करण्यात आले सर्वेक्षण -
फेज - 2 अंतर्गत अरुणाचल प्रदेश, चंदीगड, छत्तीसगड, हरियाणा, झारखंड, मध्य प्रदेश, दिल्ली एनसीटी, ओडिशा, पुदुच्चेरी, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड ही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. फेज - 1 मध्ये समाविष्ट 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांबाबत राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-5 चे निष्कर्ष डिसेंबर 2020 मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते.
आरोग्य आणि कुटुंब कल्याणाशी उद्भवणाऱ्या अन्य समस्यांशी संबंधित विश्वसनीय आणि तुलनात्मक संकलित माहिती प्रदान करणे हा राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा उद्देश आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-5 अंतर्गत देशातील 707 जिल्ह्यांतील सुमारे 6.1 लाख कुटुंबांचे नमुने संकलित करून हे सर्वेक्षण करण्यात आले.
हेही वाचा -Son died by fathers car : वडीलांकडून नकळतपणे कार गेली मुलाच्या अंगावरून