हैदराबाद - अफगाणिस्तानचे पहिले उपाध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांनी स्वत:ला अफगाणिस्तानचे अध्यक्ष म्हणून घोषित केले आहे. त्यांच्या या कृत्याला अमेरिकेच्या शीर्ष धोरण विश्लेषकाने पाठिंबा दिला आहे. यासाठी त्याने अफगाणिस्तानच्या संविधानाचा हवाला दिला आहे.
हेही वाचा -शिवसेना भवन परिसरातील सुरक्षा वाढवली; भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात
मायकल जॉन्स, असे या विश्लेषकाचे नाव आहे. मायकल हे नॅशनल टी पार्टी मुव्हमेंटचे सहसंस्थापक आणि अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे माजी भाषण लेखही आहेत. त्यांनी ट्विटरवर सांगितले की, 2004 साली स्वीकारण्यात आलेले अफगाणिस्तानचे संविधान सध्याच्या घडीला देशात जी परिस्थिती उदयास आली आहे, त्यावर राष्ट्र शासनास मार्गदर्शन करते. अशा परिस्थितीत, पहिले उपाध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांच्याकडे अध्यक्षपद जाते. राष्ट्राने कायद्याचा आदार केला पाहिजे, हिंसेचा नाही.